Talk, Bholepana ani nirvicharitecha killa

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

[Marathi transcript ver 1]

भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असे म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातील सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजेत. दूसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपणा. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपणा. काही काही मोठी माणसेपण फार भोळी असतात हो! ठगविली जातात ती. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. छळतातही फार ! म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आज ही छळताहेत. याचेच रडू येते कधी, कधी. आपण जी मंडळी पार झालात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे तर देवता स्वरूप आहात. आज देवतांच्या ठिकाणी तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव ज्यांचे वर्णन आपण पुराणात वरगैरे वाचले असेल. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देवपण आलेले आहे आपल्यामध्ये. तेव्हा आ देवपणामध्ये भूते ही पिंगा घालणारच! आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देत. कुठवर त्रास देणार? जिथप्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात, तीन डायमेंशनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. तुमच्या मनाला दुखापत होईल, होऊ दे. पण तुम्हाला बालेकिल्ला दिलेला आहे मी, दाखवलेला आहे मी. जो तुमच्याच आतमध्ये आहे. तो म्हणजे निर्विचार स्थिती. थॉटलेस अवेअरनेस. तुम्ही जर त्या किल्ल्यात बसलात तर कोणाची हिम्मत नाही तिथे पाय ठेवायची! हे लक्षात ठेवा. पण त्या किल्ल्यात बसण्याची सवय लावली. पाहिजे. श्रीकृष्णाला रणछोडदास म्हणतात. रणछोडदास म्हणजे दूसरे तिसे काही नसून या सगळ्या दुष्टांचा मारा चुकवून आपल्या बालेकिल्ल्यात शिरला तो. म्हणून त्याला रणछोडदास म्हणायचे आणि हे सगले बसले बाहेर बोंबलत. बऱ्याच काळ्या विद्या सुरू झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. घाणेरडे लोक, घाणेरडे प्रकार करीत आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते तुम्हाला त्रास देतात हे मलाही माहिती आहे. छळतात. करून, करून करणार काय ? आम्ही बालेकिल्ल्यात आल्यावर बघून घेऊ म्हणावे. पण तुम्ही आपला बालेकिल्ला विसरलेला नाहीत. हे संरक्षणाचे स्थान कधीही मानवाला लाभलेले नव्हते. ते आज महामुश्किलीने तुम्हाला मिळालेले आहे, त्याचे दार उघडलेले आहे त्याच्यात बसा. बघते कोण तुम्हाला

छळते आहे आणि कोठून तुम्हाला हे आजार होणार. या बालेकिल्ल्यात तुम्ही बसले पाहिजे. घरची घरची सगळी मंडळी विरोधात असली तरी त्यांच्या डोक्यावर टिच्चून बसले पाहिजे. कारय करता तुम्ही आपचे बघू या! सारा समाज जरी तुमच्या विरोधात असला तरी त्या बालेकिल्ल्यात तुम्हाला राहिलेच पाहिजे. आणि शेवटी सबंध विश्व जरी तुमच्या मागे लागले तरी या बालेकिल्ल्यात कोण येणार आहे आत! आणि ज्या दिवशी तो आतमध्ये आला त्या दिवशी तो ही पार झाला. ही अशी कमाल आहे याची. हा चमत्कार हातात आहे आपल्या. ओढा सगळ्यांना आपल्या बालेकिल्ल्यात. म्हणावे, मग बघू या! मग कुणाशी हात करणार! कारण सगळे एक आहेत हे महामूर्खांना कळले मग! हे सगळे महामूर्ख जे फिरत आहेत ते स्वत:चे नरक बनवत आहेत. आणि या वेळेला जर दडपले गेले नरकात तर उठू नाही देणार त्यांना! तेव्हा सावध रहा. असे घाबरण्यासारखे काहीच नाही. जर तुमची पूर्ण तयारी असेल तर या बालेकिल्ल्याचा मोठा किल्ला तयार करू या. पण कलीयुगात कोणाची हिम्मत नाही की समोर येऊन माझा मुकाबला करतील. पाठीमागून लहान लहान पोरांना धरून मारणारे हे हत्यारे लोक आहेत. तेव्हा तिकडे लक्ष देऊ नका. काहीही तुमचे वाकडे होणार नाही आणि कधीही होणार नाही. पण आपले छत्र मात्र डोक्यावर ठेवा. त्यांच्या कह्यात येऊ नका. या दादरला अशी दोन-चार मंडळी बसलेली आहेत आणि त्यांनी ही काळी विद्या इथे सुरू केलेली आहे. किती तरी लोकांच्या घरांची धूळधाण करून ठेवलेली आहे. मला माहिती आहे. मी मागेसुद्धा सांगत होते. आपल्याला माहिती आहे. त्यातले दोन गेले. सोडून गेले दादर. दोन अजून आहेत. त्यांना कोणाचे कल्याण करायचे नाही. स्वतःचेच पोट भरायचे आहे. पैसे कमवायचे आहेत. कमवा म्हणावे. सगळेच कमवतात पैसे! पण नाव देवाचे घेतले आहे त्यांनी! देवाच्या नावावरती पैसे कमवत आहेत त्याला हरकत नाही, पण देवाच्या नावावरती तुम्ही जर भूते विकू लागलात तर त्याला मात्र तुम्हाला क्षमा करणे कठीण जाईल. परमेश्वर कधीही अशा लोकांना क्षमा करणार नाही. पूर्वीची जी भूते होती ती भूतेच होती. डायरेक्टली भूतेच होती. पण अशा देवाच्या नावावर भूते विकणारी ही मंडळी, गंडे-दोरे हातात बांधायचे आणि तुमच्या घरात भूते पाठवायची. सर्रास हे धंदे चालले आहेत. आमच्या लंडनला तर इतके आहे, की मला आश्चर्य वाटले, की हे लंडन आहे की भूत नगरी आहे. तिथे पाय ठेवल्याबरोबर म्हटले नुसता भूतांचा सुळसुळाट! सगळी भूतंखेतं एवढी करून ठेवलेली आहे. ज्या ख्रिस्तांनी सांगितले होते ‘कोणत्याही भूताच्या मार्गावर जाऊ नका. भूतांची कार्ये करू नका.’ हे सगळे ख्रिश्चन स्मशानात जाऊन तिथून रक्त आणून, राख आणून हे धंदे करतात. प्लॅचेट काय करतात. म्हणजे ज्या गोष्टीला मना केलेले आहे त्याच करतात. हे ख्रिस्तांनी सांगितले तसे एक नानक साहेबांनी सांगितले. स्पष्टपणे इतके कोणी बोलले नव्हते या भूताखेतांबद्दल. आणि ते हे सगळे ख्रिश्चन लोक जे ब्रिटीश म्हणून मोठे फिरत होते आपल्याकडे, आता त्यांच्या मानगुटीवर बसले आहेत हे सगळे. गल्लोगल्ली भूतांचे कारखाने उघडून ठेवलेले आहेत. यांच्या अकलेला काय म्हणावे मला समजत नाही. आणि मी भुताटकीच्या विरूद्ध बोलते तर लोकांना ते पटत नाही. फरक एवढाच आहे, की आपण लोक त्याला देवाचे नाव देतो, ते त्याला भूतांचेच नाव देतात. सैतान-क्राफ्ट म्हणतात, विचक्राफ्ट म्हणतात. आपल्यासारखा खोटेपणा नाही त्यांच्यात, पण इथून एक्सपोर्ट केलाय तुम्ही. पुष्कळ एक्सपोर्ट झाले आहेत. इथून गेलेत तिकडे, मोठमोठे भुतांचे राजे तिकडे

होऊन. आणि काय पैसे कमावलेत! एकएका माणसाजवळ पस्तीस, पस्तीस रोल्स आहेत. एका रोल्स राइईसला आठ लाख रूपये किंमत पडते, दहा लाख रुपये किंमत पडते. हे तिथे इंग्लंडला सुरु झालेले आहे. आता हिंदुस्थानात काही कमी नाही तुमच्या. तुम्हाला धर्म हवा की अधर्म हवा हे तुमचे तुम्ही पाहिले, ठरविले पाहिजे. जर धर्म हवा असला तर खऱ्या गोष्टीवर उभे राहा. ज्यांना खोट्या गोष्टी हव्या असतात त्या माझ्याजवळ नाहीत. माझ्याजवळ चमत्कार नाहीत की तुम्ही म्हणालात, ‘मला एक अंगठी द्या.’ माझ्याजवळ मेडिटेन आहे. माझ्याजवळ, तुमच्याजवळ शक्ती घेण्याची, तुमच्या आतमधली परमेश्वराने एवढी संपत्ती दिलेली आहे ती उघडण्याची कला शिकवायची आहे मला. मी म्हणते एवढ्या अंगठ्या वाटतात हे लोक आपला हिंदुस्थानचा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करा तुम्ही. यांना पंतप्रधान करा सगळ्यांना अंगठ्या वाटतील. श्रीमंत लोकांनाच कशाला अंगठ्या वाटतात. तिकडे वाटा ना! आहेत आमच्या इकडे पुष्कळ गरीब लोक. गरीबांकडे लक्ष नाही या लोकांचे. श्रीमंतांच्या खिश्याकडे आहे आणि हे श्रीमंतसुद्धा मूर्खासारखे तिकडेच जाणार. असा हा प्रकार चाललेला आहे. आज ही दैन्यदशा या देशाला आलेली आहे त्याला कारण ही भूते आहेत, हे तुम्हाला माहिती नाही. तेव्हा अशा लोकांना थोड्याशा फायद्यासाठी मुळीच मदत करू नये आणि यांच्या दारात उभे राह नये. कोणी भुताटकीच्या गोष्टी केल्या तर त्यांच्या दारात उभे राह नये. कितीही म्हटलं तरी धर्मातच सगळे आहे. धर्मातच सगळे आहे, इथून तिथून लक्ष्मीपर्यंत जेवढे काही संसारात आहे ते सुद्धा धर्मातच आहे. आणि त्याच्या पलीकडचेसुद्धा धर्मातच आहे. सगळे धर्मातच आहे. सगळे धर्मानीच बनवलेले आहे. धर्माच्या पलीकडे काहीही नाही. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते तुम्हाला सांगण्यासारखेही नाही. सात बाकीच्या पिढ्या आहेत. ते भोगायचे असले आणि मनुष्य योनीतून किड्यांच्या योनीत जायचे असले तर या लोकांच्या मार्गावर तुम्ही जा. तोंड उघडून या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे की हे सगळे जादूचे खेळ बंद करा. त्याबद्दल भिण्याची काही गरज नाही. आतली जादू झाली पाहिजे. आतमध्ये प्रकाश आला पाहिजे आणि त्याच्या आनंदात सगळीकडे ही बहरलेली जी फुले आहेत त्यांचा प्रकाश पसरला पाहिजे. म्हणजे हे चिखल जे आहे ते बदलून त्या ठिकाणी एक कमळाचे सरोवर निर्माण होईल. ही वेळ आलेली आहे. संबंध सृष्टी या वेळेला तयार आहे. पंचमहाभूते तुमच्या मदतीला उभी आहेत. तिकडे सगळे मोठे मोठे अवतारी पुरुष या कार्याला आशीर्वाद देत आहेत आणि सगळ्यांची ही पूर्ण तयारी आहे, की तुम्हाला काहीही लागले तरी आम्ही तयार आहोत. पर फक्त हे मानवाच्या हातात आहे, की हा निश्चय झाला पाहिजे, की आम्ही धर्मात आहोत की अधर्मात! आम्ही धर्माला उभे राहणार आहोत की अधर्माला उभे राहणार आहोत. धर्म तुम्ही पैशानी विकत घेऊ शकत नाही. परमेश्वराला तुम्ही बाजारात काढलेले आहे. हे धिंडवडे तुम्ही सगळे धर्माचे केलेले आहेत. साध्या भोळ्या लोकांना फसवून धर्माची ही विटंबना केलेली आहे त्याची पापं भोगलीच पाहिजेत. पर सगळ्यात मोठे पाप म्हणजे संतांना त्रास सुद्धा देणे. जे परमेश्वराच्या शोधात आहेत त्या लेकांना मार्गापासून च्युत करणे. याच्यापेक्षा मोठे पाप संसारात काही नाही आणि त्याची शिक्षा इतकी भयंकर आहे, की सांगण्यासारखी नाही तेव्हा अशा कार्यात कोणीही

पडू नये. धर्म जितका सुंदर आहे, जितका मार्गदर्शक आहे, धर्म जितका प्रेम देणारा आहे, जितका मायाळू आहे, सर्वांना आपापसात घेणारा आहे, तितकाच धर्म जाज्वल्य आहे. तो जाळून टाकेल, पोळून टाकेल, संहार करून टाकेल सर्वांचा ! त्या धर्माची जशी शक्ति आहे तशी अग्निची आहे हे लक्षात ठेवा. या वेळेला जास्त बोकाळलेले दिसते आणखी जास्त या दादरला! कसले कसले रोग, कसले कसले त्रास आज आम्ही आपल्या आई, बहिण, मुलांना देत आहोत . आम्हीच देत आहोत. दूसरे कोणी देत नाही. कोणी मांजरी देत नाहीत आपल्याला त्रास. आम्ही माणसेच माणसाला देत आहोत. माणूसच माणसाचा गळा कापतो आहे. कोणी दुसरे येऊन कापत नाही तुमचे गळे. कारण माणसातच राक्षस घुसले आहेत आणि माणसातच भक्त आहेत. भक्तांचे गळे कापणे हेच राक्षसांचे कार्य आहे. जर ते केले नाही तर ते राक्षस कशाला! पण त्याहीपेक्षा बिकट अवस्था अशी आहे, की प्रत्येक संतांमध्ये राक्षस घुसलेला आहे. मी तरी काय करू! ज्याला आपला मुलगा करते त्याच्यात राक्षस घुसला, करू तरी काय मी! त्याला धड मारता येत नाही आणि जवळही घेता येत नाही. काय या आईची दुर्दशा ! आपल्या मुलाला भेटायला आले तर एक एक राक्षस डोक्यावर घेऊन बसलेले आहेत. आता मी काय करू! अरे ते राक्षस फेका डोक्यावरचे. कशाला उचलून धरलेत डोक्यावर. काय दिलंय तुम्हाला राक्षसांनी? ही धरा हरली तुमच्यापुढे! तो सूर्य हरला तुमच्यापुढे! त्या समुद्रानेसुद्धा अंग टाकले आहे की, ‘संपलो बुवा या मानवाच्या मूर्खपणाला. ‘ संत माणसांना त्रास देणाऱ्या माणसाने लक्षात ठेवावे, की दोन-चार पैशासाठी जर त्यांनी एखाद्या संताला त्रास दिला तर याचा जाब आजच नाही, तर जन्मजन्मांतर पर्यंत त्यांना द्यावा लागणार आहे. मला हे ही माहिती आहे, की आज या समाजात अशी दोन-चार मंडळी येऊन बसलेली आहेत, पैसे खाऊ. त्रास देण्यासाठी ते इथे येऊन बसलेले आहेत. लक्षात ठेवावे. त्या राक्षसांची मीच आई आहे आणि तुमची ही आई मीच आहे. पण तुमच्या बचावासाठी यांना पुष्कळदा मारलेले आहे आणि आणखी मारणार आहे. काळजी करू नका. स्वत:चाच जीव आहे, पण मारणार आहे त्यांना मी. बघू दे! थोडीशी माणसे होतील त्यांच्यातील, पण बघू दे! पण तुम्ही त्यांच्या खेळण्यात आणि खेळवण्यात येऊ नका. खोट्या गोष्टींनी आपली पोटे भरत नाही. साऱ्या देशाचा नाश तर झालाच आहे, पण पुढल्या येणार्या पिढीचा नाश करू नका. मोठमोठाले जीव आता जन्माला येत आहेत. त्यांच्यासाठी नरकपुरी करू नका. त्यांच्या स्वागतासाठी काही तरी विशेष रचना करा. पृथ्वी सौंदर्यपूर्ण करा त्यांच्यासाठी. काय केले आहे तुम्ही आपल्या मुलांसाठी. आम्ही उभे आहोत. काय पाहिजे आहे ते मागा. देऊ, पण सुबुद्धी कोठून देणार आम्ही! आम्ही सुबुद्धी कोठून उसनी आणू तुमच्यासाठी. सुबुद्धी तुमची तुम्हालाच पाहिजे. तेवढी मात्र तुम्ही आणा. बाकी मेहनत आम्ही करायला तयार आहोत . तुमच्यात आहे ते. ते बीज तुमच्यातच आहे. अगदी खरी गोष्ट आहे. तुमच्यातच ते बीज आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला. तो ज्यामुळे झाला ते तुमच्यात आहे. त्याला काही वाल्मिकी व्हायचे नव्हते. तेवढी सुबुद्धी नव्हती, पण डोक्यात आले ‘दोन-चार पैशांसाठी मी माझा आत्मा मारतो आहे.’ त्याच दिवशी त्यांनी हे ठरवले, त्याच दिवशी त्यांनी हा निश्चय केला की, ‘झाले पुष्कळ केले हे.

कोणासाठी करतोय मी ? माझ्यासाठी मी काय केलेले आहे?’ हा विचार एकदा घ्या. ‘मी माझ्यासाठी काय केलेले आहे?’ तुमच्यासाठी मी तळमळत आहे इथे. माझा जीव तळमळतो आहे तुमच्यासाठी, क्षणोक्षणी. तुमच्यामध्ये दिवा लावायचा आहे. असा दिवा जो सर्व संसारात पसरला पाहिजे. या भारतातच तो दिवा लागणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आज . घाबरू नका. दोन-चार दिवसाचीच गोष्ट आहे. हे दिवस काढून घ्या. उद्या लहरीच्या माथ्यावर तुम्हीच जाऊन बसणार आहात, हे लक्षात ठेवा. एकच कारण आहे, आमच्या भारतात सगळे खराब आहे असे मानतो आम्ही, तरी एक कारण आहे, आईचा अपमान करायला आम्ही अजून शिकलेलो नाही. आईच्या इज्जतीची आम्हाला अजून इज्जत आहे. जोपर्यंत हे तुमच्यात राहील तोपर्यंत या देशाचे स्थान कधीही बदलणार नाही. ही भांग भूमी आहे की योग भूमी आहे ते तुम्ही ठरवायला नको. ते परमेश्वरानेच ठरविलेले आहे आधी आणि त्या देशात जन्मलेले लोक तुम्ही स्वत:ला कमी समजता का खायला नाही म्हणून! अरे, तुम्हीच लोक असे राह शकता. त्या लंडनचे लोक थोडेच राह शकतात असे? त्यांना जर एवढेसे कमी-जास्त झाले तर लढायला बसतात. हे तुम्ही लोक खरोखर सन्यासी लोक आहात. कुठेही झोपतात, कुठेही खातात आणि मजेत राहतात. आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आपल्या आईची बेइज्जत करायची असली तर करा आणि मग भोगा त्याची फळे! आईबरोबर रुसता येते. बरोबर आहे, पण मानवात जर सगळ्यात उच्च नातं कोणते असेल तर ते आईचे आहे आणि तिच्यातच तुम्हाला देवाचे दर्शन होते आणि या देशातली आई आहे ती एवढे सहन करून घेते. तिकडे काही नाही. मुल दहा वर्षाचे झाले की काढून टाकतात घरातून. आणि मुलांनी घरात काम नाही केले तर त्यांच्याकडून पैसे घेते जेवणाचे. अशी आई तिकडे राहते. मुलगा मेला तरी चालेल. कारण त्याच्यावर दोन पैसे खर्च करायला नको कारण तिला लिपस्टिकसाठी पैसे पाहिजेत. नव्वद वर्षाच्या म्हातारीला. आज तुम्ही आपल्या आईची काय इज्जत करून ठेवली आहे, ते बघा! इथेच अशी आई जन्माला येते. भारतासारखी आई कुठेच नाही जगात. तुम्ही जाऊन बघून या आणि तिथे हे हाल करून ठेवेलेले आहेत ! हलणार तुमचा धर्म मग! धर्म हलवला नाही पाहिजे तर आपल्या आईची बेइज्जती करायचा जो काही मनसुबा आहे तो सोडून टाका आता. ते पैसे वर्गैरे परत करा. सगळे माहिती आहे आम्हाला. आम्ही काय तुम्हाला लोकांना ओळखत नाही का? बरं, काही असले तरी या जन्मात आता पार व्हायचे आधी लाडू खाऊ या, मग बघू, त्याच्यापेक्षा आईला काय आनंद वाटणार आहे ? सगळा स्वयंपाक सुंदरपणे करून ठेवला आणि मुलावर रागवायचे म्हणजे काय हे! पण करावे लागते. तेव्हा आता जेवायला बसा आरामात. आरामात जेवायला बसा आणि प्रेमाचे अमृत तुमच्याकडून वाहू दे सगळ्या जगामध्ये आणि साऱ्या जगाची दिशा अमृत मिळवून घ्या. बदलायला बसलोय आपण! काय लहान-लहान गोष्टी घेऊन बसलेले आहात! जगाच्या इतिहासात या गोष्टी जाणार आहेत. लक्षात ठेवा ज्या ज्या लोकांनी मूर्खपणा केलेला आहे. एकेकाची नावे जगाच्यासमोर जाणार आहेत आणि लोक थुंकणार आहेत त्यांच्यावर. त्यांच्या मुलांवर थुंकतील, त्यांच्या मुलांच्या मुलांवर थूंकतील, हेच ते घाणेरडे लोक त्यांनी हे घाणेरडे काम केलेले आहे. आपले कार्य उज्वल करा.

आपला चेहरा उजळ करा. मुलांना हेच द्यायचे आहे. ध्यानात जा. डोळे मिटा, असल में जो आज भाषण देना था उसको मराठी भाषा के सिवा मज़ा नहीं आता। ये वीरपूर्ण भाषा जो है ये हिंदी में जमती नहीं अपने को। मराठी में जमता है। इसलिए माफ कीजिए कि मराठी में बातचीत की। हिंदी में बातचीत नहीं की इसलिए माफ कीजिए। ये जरा किसीके लिए कहना था। वह आपके लिए था भी नहीं। भरकटलेले लोक असतात. डोळे मिटा. नाव वरगैरे घेऊ नये. सध्या या वेळेला नाव घेऊ नका. पुष्कळ वर्गैरे बरेच केलेले आहेत. काय आहे ? कोण गुरू आहेत, कोण गुरू नाहीत हे कसे ओळखायचे ? गुरू याला काहीतरी जाणीव असते आतमध्ये. ते कसे समजायचे ? ते व्हायब्रेशन्सने कळते. हातावर येणाऱ्या या चैतन्य लहरींनी कळते की कोण गुरू आहेत आणि कोण नाहीत. तेव्हा ते आधी शिकून घ्या. मग गुरू करा. आधीच काय करता वेड्यासारखे. डोळे तर घ्या आधी. गुरू बिरू तिकडे ठेवा. नमस्कार करून सगळ्यांना बाजूला ठेवा. सध्या तुम्ही तुमचे गुरू आणि आम्ही तुमची आई.

[Marathi transcript ver 2]

परम पूज्य माताजींने दिनांक २२ january 1975 रोजी sritom येथे केलेले भाषण.

आता काल भारती विद्याभवन मध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल सांगितलं होतं आपल्याला. पुष्कळ लोक असं म्हणाले कि आमच्या डोक्यावरून गेलं. तेव्हा हृदयातून जाणारं काहीतरी सांगायलाच पाहिजे. डोक्यातून आतमध्ये खरंच काही घुसत नाही. जे लोक फार मोठे मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे वगैरे आहेत त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिलेत. आणि एक साधारण मनुष्य अशिक्षित, ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजच सहजयोग घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असं म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातल्या सर्व लौकिक गोष्टी जाणता येत नाहीत. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजे, दुसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपण. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इंनोसन्स (innocence) म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपण. काही काही मोठी माणसं पण फार भोळी असतात हॊ. ठगवली जातात. अशा लोकांना लोक त्रास हि जास्त देतात. छळतातही फार. म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय ह्या जगानी आणि आज हि छळताहेत. त्याचाच रडू येत कधीकधी. आपण जी मंडळी पार झालेली आहात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे पण देवता स्वरूप. आज देवतांच्या ठिकाणीच तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव. ज्यांचं वर्णन आपण पुराणात वगैरे वाचलेलं असेल. हे देव जागविले गेलेत आपल्यामध्ये. हे देव पण आलेलं आहे आपल्यामध्ये. तेव्हा अशा देवपणामध्ये भुतं हि पिंगा घालणारच आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देतं. कुठवर त्रास देणार. जिथेपर्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात (teen dimension) तीन डायमेन्शनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला प्राप्त करतील. करू देतं. शरीर हे नश्वरच आहे. तुमच्या मनाला दुखापत होईल होऊ देतं. पण तुम्हाला एक बालेकिल्ला दिलॆला आहे मी. दाखवलेला आहे मी. जो तुमच्याच आत मध्ये आहे. तो म्हणजे निर्विचार स्थिती. आपल्या सगळ्यात आहे. तुम्ही जर त्या किल्यात बसलात तर कुणाची हिम्मत नाही तिथे पाय ठेवण्याची हे लक्षात ठेवा. पण त्या किल्ल्यात बसण्याची सवय लावली पाहिजे. श्री कृष्णाला रणछोडदास म्हणतात. रणछोडदास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या सगळ्या दुष्टांचा मारा चुकवून आपल्या बालेकिल्ल्यात शिरला तो म्हणून त्याला रणछोडदास म्हणायचं. आणि हे सगळे बसले बाहेर बोंबलत.
पुष्कळ काळी विद्या सुरु झालेली आहे हॆ आपल्याला माहितीये. घाणेरडे लोक घाणेरडे प्रकार करत आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते तुम्हाला त्रास देतात हेही मलाही माहितीये. छळतात. करून करून करणार काय. आम्ही बालेकिल्यात आल्यावर बघून घेऊ म्हणावं. पण तुम्ही आपला बालेकिल्ला विसरला नाहीत. हे संरक्षणाचा स्थान कधीही मानवाला लाभलेलं नव्हतं ते आज महामुश्किलीने तुम्हाला मिळालेलं आहे. त्याच द्वार उघडलेलं आहे त्याच्यात बसा.

बघते बरं कोण तुम्हाला छळतंय आणि कुठून तुम्हाला हे आजार होणार आणि रोग होणार. त्या बालेकिल्यात तुम्ही बसलं पाहिजे. घरची सगळी मंडळी जरी विरोधात असली तरी त्यांच्या डोक्यावर टिच्चुन बसलं पाहिजे. काय करता तुम्ही आमचं ते बघू यात. सारा समाज तुमच्या विरोधात उभा असला तरी त्या बालेकिल्यात उभ झालचं पाहिजे. आणि शेवटी सबंध जर विश्व जरी तुमच्या मागे लागलं तरी तुम्ही त्या बालेकिल्यात बसल्यावरती कोण येणार आहे आत. आणि ज्या दिवशी तो आतमध्ये आला त्यादिवशी तोही पार झाला. हि अशी कमाल आहे. हा चमत्कार हातात आहे आपल्या. ओढा सगळ्यांना आपल्या बालेकिल्ल्यात. सगळ्यांनाच बघुयात. मग कोणाशी हात करणार कारण इथे सगळे एक आहेत हे कळलं या महामूर्खाना मग. हे जेवढे महामूर्ख फिरत आहेत ते स्वतःचेच नर्क बनवत आहेत. आणि ह्या वेळेला जर दडपले गेले तर नरकात तर उठू नाही देणार त्यांना. तेव्हा सावध राहा. असं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. जर तुमची पूर्ण तयारी असेल तर या बालेकिल्ल्याचा मोठा किल्ला तयार करूयात. या कलियुगात कोणाची हिम्मत नाही कि समोर येऊन माझ्याशी मुकाबला करतील. पाठीमागून लहान लहान पोरांना धरून मारणारे हे हत्यारे लोक आहेत. त्या तिकडे लक्ष देऊ नका. काहीही तुमचं वाकड होणार नाही आणि कधीही होणार नाही. पण आपलं छत्र मात्र डोक्यावरती ठेवा. त्यांच्या कह्यात येऊ नका तुम्ही.

त्या दादरला तुमच्या अशी दोन चार मंडळी बसलेली आणि त्यांनी हॆ काळॆ विद्येचं सुरु केलेला आहे. कितीतरी लोकांच्या घराची धूळ धान करून ठेवलेली आहे. मला माहितीये , मी मागे सुद्धा सांगत होते आपल्याला माहित आहे. त्यातले दोन गेले सोडून गेले दादर. अजून आहेत. त्यांना कुणाचं कल्याण करायचं नाही. स्वतःच पोट भरायचं. पैसे कामवायचेत. कमवा म्हणावं सगळेच कमावताहेत पैसे. पण नाव देवाचं घेतलेले आहे त्यांनी. देवाच्या नावावरती पैसे कमावतात आहेत त्याला हरकत आहे. पण देवाच्या नावावरती जर तुम्ही भुतं विकू लागलात तर मात्र तुम्हाला क्षमा करणं कठीण आहे. परमेश्वर कधीही अशा लोकांना क्षमा करणार नाही. पूर्वीची भुतं कशी directly (डायरेक्टली) भुतं होती. पण आता देवाच्या नावावरती भुतं विकणारी हि मंडळी. गंडे दोरे हातात बांधायचे आणि तुमच्या घरात भुतं पाठवायची. सर्रास हे धंधे चाललेत. आमच्या लंडनला तर इतकं आहे कि मला आश्चर्य वाटलं कि हे लंडन आहे कि भुतनगरी आहे. तिथे पाय ठेवल्याबरोबर मात्र नुसता भुतांचा सुळसुळाट. सगळी भुताटकी उभी करून ठेवलेली आहे. ज्या ख्रिस्तानी सांगितलेली होतं कि कोणत्याही भुतांच्या मार्गावर जाऊ नका. भुतांची कार्य करू नका. ते सगळे ख्रिश्चन लोक स्मशानात जाऊन तिथून रक्त आणून राख आणून आणि धंधे करतात. प्लँचेट (planchet ) काय करताहेत. म्हणजे ज्या गोष्टीला मना केल तेच करताहेत. हे ख्रिस्तांनी सांगितलं तसं एक नानक साहेबांनी सांगितलं. स्पष्टपणॆ कोणीही बोललं नव्हतं या भुताटकीबद्दल. आणि जॆ हे सगळे ख्रिश्चन लोक जे आपल्याकडे ब्रिटिश म्हणून फिरत होते पूर्वी मोठे आता त्यांच्या मानगुटीवर बसलेत सगळॆ तॆ. गल्लोगल्ली भुतांचेच कारखाने उघडून ठेवलेले आहेत. त्यांच्या अक्कलेला काय म्हणावं मला समजत नाही. आणि मी भुताटकीच्या विरुद्ध बोलते तर लोकांना ते पटत नाही. फरक एवढाच आहे कि आपण लोक त्याला देवाचं नाव देतो, ते त्याला भूताचच नाव देतात. त्याला ते सैतान त्रास म्हणतात विच त्रास म्हणतात . आपल्यासारखा खोटेपणा नाही त्यांच्यामध्ये.

पण इथून एक्स्पोर्ट केलंय तुम्ही. पुष्कळ एक्स्पोर्ट झालंय. इथून गेलेत तिकडे मोठे मोठे भुतांचे राजे तिकडे भुतं घेऊन आणि काय पैसे कमावलेत. एकेका माणसाजवळ 35-35 रॉल्स रॉईस आहेत. एका रॉल्स रॉईसला 8 लाख किंमत पडते सॉरी 10 लाख रुपये किंमत पडते . हे तिथे इंगलंडला सुरु झालेलंय. आता हिंदुस्तानात काही कमी नाहीये तुमच्यात. तुम्हाला धर्म हवा कि अधर्म हवा हे तुमचं पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. जर धर्म हवा असला तर खऱ्या गोष्टीवर उभे राहा. ज्याला खोट्या गोष्टी हव्या असतात त्या माझ्याजवळ नाहीत. माझ्याजवळ चमत्कार नाहीत, कि तुम्ही म्हणाला कि मला एक अंगठी द्या. माझ्याजवळ मेडिटेशन आहे. माझ्याजवळ तुमच्यामधली शक्ती घेण्याची तुमच्यामधली जी आतमध्ये परमेश्वराने एवढी संपत्ती दिलेली आहे ती उघडण्याची कला शिकवायची आहे मला. मी म्हणते एवढ्या अंगठया वाटताहेत हे लोक तर आपल्या हिंदुस्थानाचा सबंध प्रॉब्लेमच सॉल्व्ह (problem solve) करा म्हणावं. यांना Prime minister (प्राइम मिनिस्टर) करा तुम्ही. सगळ्यांना अंगठ्या वाटतील. श्रीमंत लोकांना कशाला अंगठ्या वाटता. तिकडे वाटा ना आहेत पुष्कळ आमच्या इकडे गरीब लोक. गरिबांकडे लक्ष नाही या लोकांचं. श्रीमंतांच्या खिशाकडे आहे. आणि हे श्रीमंतसुद्धा मुर्खासारखे तिथेच जाणारं. असा हा प्रकार चाललेला आहे. आज हि दयनीय दशा या देशाला आली त्याला कारण हि भुतं आहेत हे तुम्हाला माहित नाही. तेव्हा अशा लोकांना थोड्याश्या फायद्यासाठी मुळीच मदत करू नये. आणि ह्यांच्या दारात उभा राहू नये. कोणी भुताटकीच्या गोष्टी केल्यात त्या दारात उभं राहू नये. किती म्हटलं तरी धर्मातचं सगळं. धर्माचाचं सबंध आहे लक्ष्मीपासून इथून तिथंपर्यंत जेवढं काही संसारातल आहे ते सुद्धा धर्मातच आहे. आणि त्याच्या पलीकडचं सुद्धा धर्मातच. सगळं धर्माचेच बनवलेलं आहे. धर्माच्या पलीकडे काहीही नाही. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते तुम्हाला सांगण्यासारखं सुद्धा नाही. सात नरकाच्या पिढ्या आहेत. ते भोगायचे असलं आणि या मनुष्य योनीतुन त्या किड्यांच्या योनीत जायचं असलं तर या मार्गावर तुम्ही चला. तोंड उघडून या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे. हे सगळे जादूचे खेळ बंद करा. त्याबद्दल भ्यायची काही गरज नाही. आतली जादू झाली पाहिजे. आतमध्ये प्रकाश आला पाहिजे आणि त्याच्या ज्या आनंदात सगळीकडे ही बहरलेली फुलं आहेत त्याचा सुगंध पसरला पाहिजे. म्हणजे हे चिख्खल जे आहे ते बदलून त्या ठिकाणी कमळाचं सरोवर निर्माण होईल.

ही वेळ आलेली आहे. संबंध सृष्टी त्या वेळेला तयार आहे. पंच महाभूत तुमच्या मदतीला उभी आहेत तिकडे सगळे मोठे मोठे अवतारपुरुष या कार्यासाठी आशीर्वाद देतं आहेत. आणि सगळ्यांची ही पूर्ण तयारी आहे कि तुम्हाला काहीही काहीही लागल तरी आम्ही तयार आहोत. पण फक्त हे मानवाच्या हातात आहे कि आता हा निश्चय झाला पाहिजे कि आम्ही धर्मात आहोत कि अधर्मात. आम्ही धर्माला उभ राहणार आहोत कि अधर्माला उभे राहणार आहोत. धर्म तुम्ही पैशाने विकत नाही घेऊ शकत . परमेश्वराला तुम्ही बाजारात काढलेलं आहे. हे धिंधवडे तुम्ही धर्माचे केलेले आहेत. साध्या भोळ्या लोकांना फसवून धर्माची हि विटंबना केलेली आहे त्याची पापसुद्धा भोगालीच पाहिजॆत. पण सगळ्यात मोठं पाप म्हणजे संतांना त्रास देणे आहे. जे परमेश्वराच्या शोधात आहेत त्या लोकांना मार्गापासून दूर करणं याच्यापेक्षा मोठं पाप संसारात काही नाहीये. आणि त्याची शिक्षा इतकी भयंकर आहे कि सांगण्यासारखी नाही. तेव्हा अशा कार्यात कोणीही पडू नये. धर्म जितका सुंदर आहे जितका मार्गदर्शक आहे , धर्म जितका प्रेम देणारा आहे, जितका मायाळू आहे जितका सगळ्यांना आपापसात घेणारा आहे तितकाच धर्म ज्वाजल्य आहे तो जाळून टाकील पोळून टाकील संहार करून टाकील सर्वांचा. त्या धर्माची शक्ती आहे तशी अग्नीची असते हे लक्षात ठेवा.

ह्या वेळेला बोकाळले दिसतंय आणखीन जास्त या दादरला मला. कसले कसले रोग, कसले कसले त्रास आज आम्ही आपल्या आई बहिणी मुलं सगळ्यांना देत आहोत. आम्हीच देत आहोत. दुसरं कोणी देत नाही. कुत्री मांजरी देत नाहीत आपल्याला त्रास. आम्ही माणसंच माणसाला देऊन राहिलोत. माणूसच माणसाचा गळा कापतोय कोणी दुसरं येऊन कापत नाही तुमचे गळे. कारण माणसातच राक्षस घुसलेत. आणि माणसातच भक्त आहेत. भक्तांचे गळे कापणं हेच राक्षसांचं कार्य आहे. जर ते केल नाही तर ते राक्षस कशाला. पण त्याही पेक्षा बिकट अवस्था अशी आहे कि प्रत्येक संतांमध्ये राक्षस घुसलेला आहे आता मी तरी काय करू. ज्याला आपला मुलगा करते त्याच्यात राक्षस घुसला आता करू तरी काय मी. त्याला धड मारता हि येत नाही आणि जवळ हि घेता येत नाही. काय या आईची दुर्दशा. आपल्या मुलांना भेटायला आले तर एक एक राक्षस डोक्यावर घेऊन बसलेले आहेत. आता मी काय करू. अरे ते राक्षस फेका डोक्यावरचे. कशाला उचलून धरलय डोक्यावर. काय दिलंय तुम्हाला या राक्षसांनी. हे आज खायला नाही प्यायला नाही. हि धरा हरली तुमच्यापुढे. तो सूर्य हरला तिकडे तुमच्यापुढे. त्या समुद्राने सुद्धा आपलं अंग टाकलेलं आहे कि संपलं बुआ या मानवाच्या मूर्खपणाने.

संत माणसांना त्रास देणाऱ्या माणसाने हे लक्षात ठेवावं कि दोन चार पैशासाठी जर आम्ही एका संताला जर त्रास दिला तर ह्याच जाब आज नाही जन्म-जन्मांतरापर्यंत आम्हाला द्यावा लागणार आहे. मला हे माहिती आहे कि आज ज्या समाजात अशी दोन चार मंडळी येऊन बसलेली आहेत पैसे खाऊ .त्रास देण्यासाठी इथे येऊन बसलेली आहेत. लक्षात ठेवाव. त्या राक्षसांची मीच आई आहे आणि तुमची मीच आई आहे. पण तुमच्या बचावासाठी त्यांना पुष्कळदा मारलेल आहे आणि आणखीन मारणार आहे. काळजी करू नका.

स्वतःचाच जीव आहे पण मारणार आहे त्यांना मी. बघू देतं थोडीशी माणसं होतील त्यांच्यातील मग बघू देतं. पण तुम्ही त्यांच्या खेळण्यात आणि खेळाव्यात येऊ नका. खोट्या गोष्टींनी असली पोटं भरत नाहीत. साऱ्या देशाचा नाश तर झालाच आहे पण पुढल्या येणाऱ्या पिढीचा नाश करू नका. मोठं मोठाले जीव आता जन्माला येत आहेत. त्यांच्यासाठी नरक तुम्ही करू नका. त्यांच्या स्वागतास काही तरी विशेष रचना करा काहीतरी सौंदर्यपूर्ण करा त्यांच्यासाठी. काय केलंय तुम्ही आपल्या मुलांसाठी इथे. आम्ही उभे आहोत काय पाहिजे ते मागा ते देऊ पण सुबुद्धी कुठून देणार आम्ही. आम्ही सुबुद्धी कुठून आणू उसनी तुमच्यासाठी. सुबुद्धी तुमचीच तुम्हालाच पाहिजे. तेवढी मात्र तुम्ही आणा बाकी मेहनत आम्ही करायला तयार आहोत. तुमच्यात आहे ते. ते बीज तुमच्यातच आहे. अगदी खरी गोष्ट आहे तुमच्यातच ते बीज आहे.
वाल्याचा वाल्मिकी झाला तो ज्यामुळे झाला ते तुमच्यात आहे. त्याला काही वाल्मिकी व्हायचं नव्हता. तेवढी सुबुद्धी हि नव्हती पण ज्यावेळेला डोक्यात आलं कि दोन चार पैशांसाठी मी माझी आत्मा मारतो आहे त्याच दिवशी त्याने हे ठरवलं. त्याच दिवशी त्यानी हा निश्चय केला कि झाला पुष्कळ केल हे .कोणासाठी करतोय मी माझ्यासाठी मी काय केलेल आहे. हा विचार एकदा घ्या. मी माझ्यासाठी काय केलेल आहे. तुमच्यासाठी मी तळमळतेय. माझा जीव तळमळतोय तुमच्यासाठी. क्षणोक्षणी.

तुमच्यामध्ये दिवा लावायचं. दिवा लावायचाय तुमच्यात असा दिवा जो साऱ्या संसारात पसरला आहे. या भारतातच तो दिवा लागणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आज घाबरू नका. दोन चार दिवसांची हि ढकल आहे. हे काढून घ्या दिवस. उद्या लहरींच्या माथ्यावर तुम्हीच जग जाऊन बसणार आहात. हे लक्षात ठेवा. ह्याला एकच कारण आहे सगळं खराब असलं आमच्या भारतात मानतो आम्ही, तरी एक कारण आहे आईचा अपमान अजून करायला आम्ही शिकलेलो नाही. आईच्या इज्जतीची आम्हाला इज्जत आहे. जोपर्यंत हे तुमच्यात राहील तोपर्यंत ह्या देशाचं स्थान कधीही बदलणार नाही. हि भोग भूमी आहे हि योग भूमी आहे. हे तुम्ही ठरवायला नको तर हे परमेश्वरानेच ठरवलेलं आहे आधीच . आणि त्या देशात तुम्ही जन्मलेले लोक स्वतःला काय कमी समजता काय. का खायला नाही म्हणून. अरे तुम्हीच लोक असे राहू शकता. त्या लंडनचे लोक थोडी राहू शकतात असे. त्यांना तर एवढीशी जराशी कॉलर कमी जास्त झाली तर रडायला बसतात. हे तुम्ही जे लोक खरोखर संन्यासी लोक आहेत. कि कुठं झोपताल आणि कुठं खताल आणि कुठंही राहताल तरी मजेत आहात. आईचा आशीर्वाद आहे तुमच्या. आपल्या आईची बेइज्जती करायची असेल तर करा आणि मग भोगा त्याची फळ. आईशी रुसता येत रागावता येत बरोबर आहे. पण मानवास जर कोणतं उच्च नातं असेल तर ते आईच आहे तिच्यातच तुम्हाला देवाचं दर्शन होतं. आणि ह्या देशाची आई आहे ती एवढा सहन करून घेते तिकडे काही नाही. मुलांना दहा वर्षांची झाले कि काढून टाकतात घरातून. आणि मुलांनी घरात जर कामं नाही केली तर पैसे घेते ती जेवणाचे. ती आई तिकडे राहते. मुलगा मेला तरी चालेल पण त्याच्यावरती दोन पैसे खर्च करायला नकोत कारण लिपस्टिकला पैसे पाहिजेत त्या 90 वर्षाच्या म्हातारीला.

आणि तुम्ही आपल्या आईच्या काय इज्जती करून ठेवलेल्या आहेत ते बघा. तिथे दैत्य आई जन्माला येते आणि भारतासारखी आई कुठेच नाही जगात. तुम्ही जाऊन बघून या. पण तिचे हे हाल करून ठेवलेले आहेत. हलणार तुमचा पण धर्म मग. धर्म हलवला नाही पाहिजे. आपल्या आईची बेइज्जती करायचा जो काही मनसुबा आहे तो सोडून टाका आता. ते पैसे बिसे परत करा. सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही तर तुम्हा लोकांना ओळखत नाही काय. बरं , काही असलं तरी ह्या जन्मात आत्ता पार व्हायचं . आधी लाडू खाऊया मग बघू. त्याच्यापेक्षा आईला काय आनंद वाटणार आहे. सगळा स्वयंपाक सुंदरपणे करून ठेवला आणि मुलावर रागवायचं म्हणजे काय हे. पण करावं लागत. तेव्हा आता जेवायला बसा, आरामात. आरामात जेवायला बसा. आणि अमृत घ्या. अमृत मिळवून घ्या. प्रेमाचं अमृत तुमच्यातून वाहू दे सगळ्या जगामध्ये. आणि साऱ्या जगाची दिशा बदलायला बसलोय आपण. काय लहान लहान गोष्टी घेऊन बसलाहेत. जगाच्या इतिहासात या गोष्टी जाणार आहेत. लक्षात ठेवा ज्या ज्या लोकांना मूर्खपणा केलेला आहे. एकेकाची नाव जगाच्या समोर जाणार आहेत आणि लोक थुंकणार आहेत त्याच्यावरती. त्यांच्या मुलांवर थुंकतील. त्यांच्या मुलांच्या मुलांवर थुंकतील के हां हेच ते घाणेरडे लोक ज्यांनी हे हे कार्य घाणेरडे केलेलं आहे. आपलं कार्य उज्ज्वल करा. आपला चेहरा उजळ करा. मुलांना हेच द्यायचं आहे.
ध्यानात जा डोळे मिटा.

(54:37)

असल में जो आज भाषण दिया था उसको मराठी सिवाय मजा नहीं आता | वीरपूर्ण भाषा जो है न, वो हिंदी जमती नहीं अपने को| ये मराठी में जमता है| मुझे माफ़ कर दीजिये हिंदी में बातचीत करी| हिंदी में बातचीत करी इसलिए माफ़ कर दीजिये| ये जरा किसीके लिए कहा था वो आपके लिए था भी नहीं|

डोळे मिटा. नाव वगैरे घेऊ नये सध्या . या वेळेला नाव घेऊ नका. भटकलेले पुष्कळ लोक असतात. गुरु बिरू बरेच केलेले आहेत. काय आहेत गुरु ? कोण गुरु आहेत ? कोण गुरु नाहीयेत? कोण गुरु आहेत ,कोण गुरं आहेत हे कसं ओळखायचं? त्याला काहीतरी जाणीव असते आतमध्ये ते कसं समजायचं ? ते vibrations (व्हायब्रेशन्स) नी कळतं. हातामध्ये येणाऱ्या ह्या चैतन्य लहरींनी कळतं कि कोण गुरु आहे नि कोण गुरु नाही. तेव्हा ते आधी शिकून घ्या आणि मग गुरु करा. आधीच काय करताय वेड्यासारखे. डोळे तर घ्या. आधी गुरु बिरू सगळे तिकडे ठेवा. नमस्कार करून सगळ्यांना ठेवा बाजूला. आता सध्या तुम्हीच तुमचे गुरु आणि आम्ही तुमची आई.