Sahajayogyanmadhe Dharma Stapna Aur Sahajayog, Dharma has to be established Within

Mumbai (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Sahajyogyan Madhe Dharma Sthapna Zali Pahije 18th December 1976 Place Mumbai Seminar & Meeting Type

ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे. मी आपल्याला आधी सांगितले की मी गणपतीसारखं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ही विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात . अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते. फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे, फारच हळुवारपणे सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेलं आहे, पण जर आपल्यामध्ये ती योग्यता नसती तर हे झाले नसते. पैकी आज हजारो मंडळी इकडेतिकडे धावत आहेत. वेड लागलंय लोकांना. विचार करत नाहीत की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे अनादी काळापासून, मोठमोठ्या तत्त्ववेत्त्यांनी आणि श्रीकृष्णांसारख्या महान, परमेश्वराचीच ती एक साक्ष आहे, त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या त्या सगळ्या एकीकडे फेकून, त्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेलं आहे, त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते महम्मद साहेबांनी लिहिलेलं असो किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो किंवा श्रीकृष्णांनी गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला ‘स्व’ जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असं म्हटल्याबरोबर लोक यापासून परावृत्त होतात कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना पटतच नाही मुळी. असत्य असलं तर ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुजतंही जास्त. असत्याची जास्त कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय तर तक्काची पायरी. तर्क गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. ते कलीयुगात दिसतंय आपल्याला चोहीकडे. बापाला मुलावर विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. सगळ्या संसारात हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात, की जसे अंधारातून कुणाला एकदम उजेडात आणलं की त्याचे डोळे दिपतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात पुष्कळ मंडळी एकदम येणार नाहीत हे लिहून ठेवते आणि जी आली ती घसरणार, कोलमडणार. त्यांना मी जागेवर बसवलं तरी ते परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी काही काळ, पण सहजयोगाला स्थायित्व किंवा जगजाहीर ज्याला म्हणतात, करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे, आम्ही काही जरी असलो तरी ते आहोतच. आमचे काही वैशिष्ट्य नाही किंवा आम्ही काही मिळवलेलं ही नाही. आम्ही जे आहोत ते असेच आहोत जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही नी घेणं नाही. तेव्हा आम्ही असलो तर लोक एवढच म्हणतील की माताजी होत्या आदिशक्ती. त्या स्वत:च आदिशक्ती असल्यामुळे त्यांचं काय आम्हाला सांगता तुम्ही. ন

Original Transcript : Marathi तर तुमच्याकडे नजर होणार लोकांची की सहजयोगामध्ये काय परिवर्तन आलं. त्यांच्या धर्माची स्थापना झाली का? कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा. कलियुगामध्ये पहिल्यांदा धर्माची स्थापना माताजींनी केली का? ती कुठे करणार, ती तुमच्या नाभी चक्रात. तुमच्यातून तो धर्म आहे की नाही, तुम्ही धार्मिक आहात की नाही, ही आधी जर सिद्धता झाली , चार लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे की यांच्यामध्ये काय बदल झाला! काय मनुष्य झालाय! कमालीची त्याच्यात चमक आलेली आहे. आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील आहे, ‘तो पुष्कळ दिवसांपासून आकाश दीप लागलेला. त्याचं काय माहात्म्य? कित्येक आले आणि गेले.’ जे दीप आम्ही लावले ते कधी लावले नव्हते. मराठी भाषेत म्हणायचे झाले तर दिवे पाजळले. तर तसे होऊ नये. खरोखर आम्ही दीप लावून दिवाळी सजवली हे तुमच्या प्रकाशातून समजलं पाहिजे लोकांना आणि याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काहीही असू शकत नाही. उद्या आम्ही वर्तमानपत्रात दिसलो , फोटो आला, मग काय माताजींचे दिसतंच आहे मुळी. साक्षातच आहे. जरूर! मग पुढे काय ? ‘किती ही म्हटलं तरी त्या आदिशक्ती, पण आमचं काय ?’ तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही ? तर भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं की तो नुसती आपली कमाल दाखवत असतो. दोन पैसे दिले की खुष. पण माताजींना म्हणतात की, ‘तुम्ही दाखवा कमाल.’ तिथेच माताजींचे चुकते. ज्यांना ज्या कमाली करायच्या आहेत त्या कराव्यात त्यांनी, पण आमच्याकडून अपेक्षा करतात, म्हणजे हे काय माताजींचे. पैसे हवे असतील तर देऊ आम्ही. काबाडकष्ट करा म्हणतील तर करू, पण आमच्यात धर्मस्थापना झाली पाहिजे. आमच्यात प्रेम दिसलं पाहिजे, संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे,’काय चमकणारा मनुष्य आहे.’ हे फार कठीण काम आहे बुवा, मग सहजयोग कसा जमणार कारण ‘आम्हाला जे धंदे करायचे आहेत ते आम्ही करत राहू.’ मी आता काल-परवाच सांगितलं , मी तिकडे सिंगापूरला गेले होते, तर तिकडे एक गुरूबाबा पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितले होते की तुम्ही स्मगलिंग करा, काहीही करा, कितीही बायका ठेवा, पुरुष ठेवा, पण पैसे इकडे द्या मात्र. शेवटी तिकडे त्यांचं सगळं स्मगलिंगचं सामान पकडण्यात आलं. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं, ‘आता त्यांना जाऊन विचारा.’ तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचत नाही मुळी. आता कोणीही घ्या. मी म्हणते, मी किती तरी रिअलाईज्ड साधू पाहिले. पुष्कळ पाहिले. ते अंबरनाथला होते, आपले महाराज होते ते. काही कुणाला काही करत नाहीत. आणि म्हटलं महाराज तुम्ही काही म्हणत का नाही? ‘मरू देत’ कारण त्यांचं असं म्हणणं आहे त्यांची पात्रताच नाही मुळी. त्यांना कशाला द्यायचे ? माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता आहे हे आधीच सांगितलं मी. योग्यता आहे हे ही सांगितलं आणि ते दिलं आहे हे ही खरं आहे. त्याबद्दल कोणाला, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाही. तर ते आतमध्ये भिनलं किती आहे. त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये तिकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू आपली लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहजयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे, खरं पाहिलं तर. अहो, इतके गणेश बसवल्यावर मला कशाला इतकी मेहनत करायला पाहिजे मला सांगा. मला तंगड्या तोडायची काय गरज आहे, जर तुमच्यासारखे एक एक मी बसवलेले आहेत. कुंडलिनी तुम्ही उठवू शकता, लोकांना पार करू शकता. एक एक मठ घालून बसला तर लाखो रुपये तुमच्या पायावर येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे. 3

Original Transcript : Marathi फक्त एकच गोष्ट कमी आहे की अजून ते तुम्ही समजला नाहीत की काय मिळालयं ते! अहो, ज्यांच्या घरगुती जागृत्या झाल्या नाहीत त्यांनीसुद्धा आश्रम चे आश्रम बांधलेत. “आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत, आहोत, गृहस्थ आहोत.” हे बाह्यातलं झालं आतमध्ये काय आहात तुम्ही. जिथे पाय पडेल तिथून बाधा पळणार आहेत. मला माहिती आहे, पाणी काढून वेगळे करण्याची तुमच्यामध्ये शक्ती असताना हे सगळं प्राप्त दुधातून झाल्यावर जर तेजस्विता येत नाही, तर त्याला आधी काय मी कारण सांगू मला समजत नाही. चक्र धरतयं म्हणजे काय? एवढी मेहनत करायला तुम्हाला गरजच नाही मुळी. नुसतं निरपेक्षतेत साक्षी स्वरूपात उभे राहिल्यावर सगळी चक्र खटकन सुटणार. कारण मिथ्या आहे ते सगळं काही. मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहोत तिथे उभे राहिल्याबरोबर सगळंच्या सगळं तुटून पडतं का नाही पहा बरं ! नुसतं चिकटवा जरा आपल्याला तिकडे. थोडंसं चित्त जरासं आतमध्ये घ्यायचं आहे. उभे तिथेच आहात, कपडे तेच आहेत, वागणं तेच आहे, नवरा आहे, बायको आहे, मुलं आहेत, बाळं आहेत, सगळा संसार आहे, समाज आहे, पण चित्तात जर तुम्ही आतमध्ये उतरलात तर सबंध संसाराची भक्ती मागे उभी आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. ही तुमच्या पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला. सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला, काय पाहिजे ते आहे पण सहजयोगावर बोलायचं तरी नव्या नवरी सारखे लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही हे मी सुद्धा शंभरदा सांगितलेलं आहे. असाल खंबीर आणि वीर तर या. मला दोन असले तरी चालतील. यायला पाहिजे वीरत्व. घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोडा कसा चालवायचा ते शिकवलं, पण तरी रडतराऊ लोक, मग करायचं तरी काय हे तुम्ही मला सांगा? आता काय तुम्हाला चिकटवायला पाहिजे का घोड्याला? चक्र ही धरलीच नाही पाहिजेत. खरोखर धरत नाहीत तुमची चक्र. आता हे बघा. याच्यात माया कशी आहे ते समजून घेतली तर तुम्हाला कळेल. चक्र तुम्ही धरतच नाही. तुम्ही इन्स्ट्रमेंट आहात. तुम्ही एक कॉम्प्युटर सारखे इन्स्ट्रमेंट आहात. तुम्हाला जी बातमी मिळते ती तुम्ही सांगता. आता समजा यांचे जर आज्ञा धरलें आहे, तर तुमचं आज्ञा धरणार नाही ही तिथे information आली, पण तुमचा तो भाऊ आहे, तेव्हा माताजी याचं आज्ञा काढा बरं! म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हा माझा अमका, हा माझा तमका, हा माझा मुलगा. काय करणार! म्हणजे धरतं ते. कोण आहे तुमचं? तुमचं कोण आहे ? तुम्ही तुमचे, एकाकार, तुमच्यामध्ये, तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात, परिभ्रमण करता आणि तिथे जे आहेत ते तुमचे होते आणि नेहमी राहणार. हे बाह्यातलं जरासं सोडायला पाहिजे म्हणजे चक्र धरणार नाहीत. फक्त information येत आहे. कोणाला जास्त येणार, कोणाला कमी येणार. ती तुमची चक्र धरत नाहीत. मग तिकडेच लक्ष. तुम्हाला ‘माझे हे चक्र धरलंय माताजी.’ ‘असं का? हे कसं तुझे धरलंय, शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझे तसं येतंय’ म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे. कळायला पाहिजे हे मिथ्या आहे. त्याची काय आशंका? म्हणजे आपण बागुलबुवा म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात. खरोखर त्याच्यामध्ये काही धरणं शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळसे लोक असंही म्हणतात की कोणी होते गुरू, कुणाला त्यांनी अमकं दिलं तर त्यांना तो आजार झाला. त्यांना तमक्यांनी बरं केलं, त्यांना तो आजार झाला. तुमच्यातल्या किती तरी लोकांनी या लोकांना व्हायब्रेशन्स देऊन ठीक केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कोणाला आजार झालेला आहे 4

Original Transcript : Marathi इथे? साक्षात गंगा तुमचे पाय धूत असते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि तुम्ही इथे उभे राहून मला हे धरलं, मला ते धरलं. सिंहासनावर बसायच्या लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा त्यामुळे आहे. राजासारखं राहायला पाहिजे. परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले. मला म्हणाले, ‘मी फार साधा राहतो. साधेपणाने राहतो, तर माताजी तुम्हाला हरकत तर नाही ? ‘ म्हटलं, ‘तुम्ही राजे आहात.’ तेव्हा व्यक्तित्वाचा पहिला विचार उभे राहिलं तर वाटलं पाहिजे, कोणीतरी उभा आहे मनुष्य. तेव्हा सहजयोगी उभे केले तर वाटायचं कुठल्या कैदेतून हे लोक आले आहेत. आपली सत्ता किती लक्षात घ्या की मातारजींनी आपल्याला काही तरी विशेष दिलेले आहे. अतिविशेष आहे मी सांगते. याची किमया मी सुद्धा शिकले तेव्हा जमलं हे. कारण तुमचे घोटाळे, हे सगळे तुमच्या कुंडलिनी अशा अटकलेल्या. त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला या मार्गावर कसं आणून सोडायचं, तुम्हाला इकडे कसं पोहचवायचं ही सगळी मेहनत आधी केली आणि मग तुम्हाला सोडवलेलं आहे. पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्मच फार जरुरी आहे. जर माणसामध्ये आपला धर्मच हालत असला तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. ‘अति वर्जयेत.’ जे काही अती असेल ते सोडायचं पहिल्यांदा, मध्यावर यायचंय नं! अती काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिशयता नसली पाहिजे. हट्ट नसला पाहिजे. वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत-खेळत सहज अगदी. ‘अति वर्जयते’ आता धर्मामध्ये काय एक साधी गोष्ट. दारू प्यायची नाही. तंबाखू ओढायची नाही. अशा या राक्षसी वनस्पती आहेत. दारू एक तऱहेचे राक्षसी मादक पेय आहे. अशा तऱ्हा आहेत. राक्षसी वस्तू आहेत जगामध्ये. त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अति करू नये. विशेषतः गृहस्थ लोकांना हा त्रास. खायचं असलं की, खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. ‘काय, काय येतंय, काही तरी चमचमीत करू या.’ मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर त्यांची जीभ खराब करून करून. तर खाण्याचं सुद्धा अती करायचं, सारखं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. खाण्याने मुलांना खराब करायच. बायकांनी नवऱ्याला खराब करायचं हे सुद्धा एक वेड आहे नुसतं आणि मग लीव्हर खराब. ‘अती वर्जयते’, नाही तर उपवास. खायचंच नाही मुळी, उपास! हे खायचं नाही, ते खायचं नाही, आठवड्यातून सात दिवस उपवास आणि नुसता फलाहार करायचा. खाण्याचंसुद्धा अती करायचं नाही. कपड्याचं सुद्धा. एक तर नागवे फिरतील नाही तर कपडे रोज तीन तीन बदलतील. काही तरी मध्ये चालतं की नाही तुमचे. स्वच्छ, व्यवस्थित, उत्तम साजेसे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अती लक्ष नको. गृहस्थ लोकांना फार जरूरी आहे. आणि त्यांना एकच फायदा असतो की मूलबाळ झाल्यामुळे अती करता येत नाही कारण मुलं चांगली काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला तर लोक हसतात मग ती मुलं एकदा हसू लागली म्हणजे वेड्याचा शहाणा तरी होतो नाही तर सोडून देतो. तेव्हा अती वर्य त्याला. करायचे. प्रत्येक बाबतीत अती वज्ण्य करायचे आणि ज्या गोष्टी सैतानाच्या राज्यातल्या आहेत तिकडे लक्ष ठेवायचं नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म काय ? जर मला कोणी विचारेल की, ‘माताजी, मनुष्याचा कोणता धर्म जरुरी आहे.’ आता इतक्या लोकांना पाहिल्यावर, एकच मला वाटतं फार जरुरी आहे, की हा जो तुमचा माथा 5

Original Transcript : Marathi आहे नं हा कोणासमोरही वाकवायचा नाही. हा जर माथा तुमचा वाकविला तुम्ही मग रिअलायझेशन फारच कठीण होऊन जाईल. सगळे भामटे आलेले आहेत त्यांच्या समोर जाऊन डोकं टेकवायचं नाही. सहजयोग्यांनी तर कोणासमोर वाकण्याची गरज नाही. दुसर्या सहजयोगी किंवा योगी माणसासमोरही डोके वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात? आज्ञा चक्र धरलच पाहिजे, आणि ते असं धरतं की सुटता सुटत नाही कारण तुमच्यावर कोणी नाही. हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाईलमध्ये आहात तर ब्रह्मा विष्णू, शिवसुद्धा तुमच्यापुढे जाऊ शकणार नाहीत. कायद्यात या तुम्ही मग बघा. बघा तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघा मी बोलते आहे ते खरं आहे का खोटं आहे ते. फक्त जसं माझं नाव आहे ‘निर्मल’ तसं स्वत:ला निर्मल ठेवा फक्त. फक्त हा शब्द आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशसुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाहीत. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकविण्याची गरज नाही. एवढे सगळे गुरुबाबा लोक आहेत नं ते माझ्या डोक्याला हात लावू शकत नाहीत. गंगासुद्धा माझ्या डोक्यावर चढ़ू शकत नाही. गंगासुद्धा माझ्या डोक्यावर चढू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात. तेव्हा ही तुमची स्थिती असताना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असताना स्वत:विषयी बरोबर कल्पना न ठेवणे, ते सहज नाही. म्हणजे असा काही गर्व करायला नको. म्हणजे आता कोणी म्हणेल की तुम्ही आदिशक्ती आहात याचा गर्व काय, म्हणजे आम्ही आहोतच ते. याचा गर्व कसला? म्हणजे आमचं काही वैशिष्ट्य नाही त्याच्यामध्ये, म्हणजे आम्ही आहोत तसेच आहोत. तसेच तुम्ही जे ते जर सहजयोगी आहात तर आहात. त्याच्यात गर्व कसला, पण रहा. एखादा समजा कोणी हिरा आहात असला तर त्याच्यात चमक येणारच. त्यात हिऱ्याला काही गर्व चढतो का! गर्व त्याला चढतो ज्याला नव्हता आणि जो उगीचच डोक्यावर घालतोय तो. त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे. तिकडे भयंकर अहंकार आहे लोकांना. ते स्वत:ला राक्षस समजतात. म्हणून इकडून गेले आहेत त्यांना नागवायला. लोक पाठवलेत नं एक्सपोर्ट करून, एक्सपोर्ट क्वालिटी. छाटून बदमाष पाठविलेले आहेत. त्या सगळ्यांचा अहंकार असाच तडाक तोडलाय तिथे की बास. गाढवा सारखे हातात चिलिमा घेऊन फिरतायत. ते इतके मूर्ख आहेत, महामूर्ख आहेत. त्यांच्या मूर्खपणाचं मी वर्णन करू शकत नाही. तुम्हाला सांगेन कधी तरी. आता मुलं बाळे आहेत. काही सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या त्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळविलेली आहे म्हणजे त्यांना पदवीदानच देता येणार नाही इतके मूर्ख आहेत ते. ते वाटेल ते करतील मूर्खपणासाठी म्हणजे आपल्याकडे वेडेसुद्धा तसं करणार नाहीत. त्यांची एक तऱ्हा आणि तुमची दुसरी तऱ्हा. कितीही म्हटलं तरी तुम्ही तसेच राहणार आणि त्यांना म्हटलं अहो, जरा डोकं खाली करा तर ते वर येणारच म्हणजे अशा दोन तऱ्हांच्या लोकांमध्ये आम्ही कुठे. थोडी तरी जागा आता सहजयोग्यांच्या मुळे आली आहे मधोमध. थोडीशी जागा. ती जरा वाढवायची आहे. मग काम बघा आमचं तुम्ही तेव्हा आता सहजयोग्यांनी काय करायचं आपला धर्म स्थापन केला पाहिजे. नंतर काम, याबाबतीत जाणलं पाहिजे की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दूसऱ्या कोणत्याही स्त्री कडे आई स्वरूपातच पाहिलं पाहिजे. कठीण नाही. ती एक फारच सोपी गोष्ट आहे, पण आजकालच्या कलीयुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातच घुसते, डोळ्यातच घुसते. पूर्वी मला आठवते आमचे आई -वडील सांगायचे की

Original Transcript : Marathi सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचं. वर डोळे करून कणी चाललं तर शेजारीपाजारी लगेच आईला जाऊन सांगायचे, ‘तुमची मुलगी अशी वर डोळे करून चालली होती.’ झालं, मग आमचे अनेक अपराध झाले मग त्यावर आईनी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं, ‘अहो, तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता’, मग नानाची कंबख्ती आली. त्याचं खाणं-पिणं बंद. ‘तू वर डोळे करून का बघत चालला होता, लक्ष कुठे होतं तुझं?’ लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा. ही मी सांगते पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट. आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे दिखावापणा जो आलेला आहे त्यामुळे जी प्रकरणं आपण केलेली त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ती तुमची आजी आहे. डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे. तिच्या आशीर्वादात राहायचं. स्वत:ला नम्र करून पृथ्वीच्या स्मरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट अर्थ, पैशाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत मनुष्याने कसे वागले पाहिजे. सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत किंवा दुसऱ्याकडे दोन वस्तू जास्त आहेत म्हणून अधाशासारखे तिकडे बघूनही पैसे मिळत नाहीत आणि त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून त्याचा गळा कापूनही पैसे मिळत नाहीत. आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांनासुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही हे तुम्ही पाहिलेले आहे . आता बुद्धिनेच हा विचार तुम्ही कायम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही तर मग कशाने मिळतं ? पैसा एक अंग आहे, मग पैशाचं कोणते अंग आहे. तेव्हा लक्ष्मी नावाचं स्वरूप मी पूर्वी सांगितलं होतं , तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी, समाधानी वृत्ती. जे मिळेल ते स्वीकार करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा. जो समाधानी नाही तो भिकारीच आहे. साधा हिशेब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही जरी मोठा असला, स्वत:ला मोठे मानत असला तरी तो भिकारी आहे आणि ज्याला समाधान आहे तो दिसायला जरी गरीब दिसला तरी तो राजा. तेव्हा समाधान मानायला पाहिजे आणि तुम्हासाठी कठीण नाही. सहजयोगामध्ये ते दिलंय आम्ही तुम्हाला, समाधान. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते ही थोडं सांगते मी.. कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. विचारच आले नाहीत तर प्रश्नही येणार नाहीत. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतीवर गेला तर विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर ज्याला आपण अचेतन मन म्हणतो, अनकॉन्शस माईंड, ते तिथे आहे. तो सगळा विचार तिथे फेकायचा. मग आम्ही तो उचलतो. तुम्हाला प्रश्न आहे नं उद्याच्या इन्कमटॅक्सचा, मग विचार करू नका. तो आणून आमच्या पायावर फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही. पण जे तुम्हाला हितकारी आहे ते होईल. हितकारी होईल आणि तेच खरं लाभदायी आहे. 7