Public Program

Ganapatipule (India)

1986-01-03 Public Program Marathi, Ganapatipule India DP-RAW, 75'
Download video - mkv format (standard quality): Download video - mpg format (full quality): Watch on Youtube: Watch and download video - mp4 format on Vimeo: Listen on Soundcloud: Transcribe/Translate oTranscribeUpload subtitles

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Sarvajanik Karyakram 3rd January 1986 Date: Ganapatipule Place Public Program Type

गणपतीपळे आणि मालगुंड ह्या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो! गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहन ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जी मालगुंडची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे की नाही असा मला प्रश्न पडला, तेव्हा काहीही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्रॅम गणपतीपुळ्यालाच घेऊ या, असं मी सर्वांना सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा शब्द उचलून धरला. नागपूरहन इथे मंडळी आली. तसेच इतर ठिकाणाहून, फार लांबून, दिल्लीहून, कोलकाताहून, फार लांबून मंडळी इथे आली. मद्रासची पण मंडळी इथे आली. माताजींनी गणपतीपुळ्याला एवढ महत्त्व दिलं तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. पण इथे आल्याबरोबर त्यांना मोठा आश्चर्यजनक आनंद झाला. कारण हे वातावरण इतक शुद्ध आणि पवित्र आहे, की ते एका आत्मसाक्षात्कारी माणसालाच जाणवू शकतं. ही जाणीव व्हावी लागते. नुसतं असं म्हणून की आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, ह्या अष्टविनायकाला गेलो, तिथे गेलो, असं केलं, तसं केलं, त्याला काही अर्थ रहात नाही. तुम्हाला काय मिळालं? असं विचारलं, तुम्ही अष्टविनायकाला गेलात, तुम्ही इतकी तीर्थयात्रा केलीत, तुम्हाला काय मिळालं? जसेच्या तसेच. इकडे गेलो, हे खर्च केले. तिकडे गेलो, हे केलं. दानधर्म केला, अमुक केलं, तमुक केलं, तीर्थयात्रा केल्या, पण का केल्या आणि तुम्हाला मिळालं काय? आता हे अष्टविनायक कोणी शोधून काढले? अष्टविनायक आहेत हे कोणी सिद्ध केलं? ही फार पुरातन गोष्ट आहे. आजची गोष्ट नाही. फार पुरातन गोष्ट आहे. तेव्हा त्या वेळेला जे आत्मसाक्षात्कारी मोठे लोक झाले, त्यांना लोक ओळखत असत. ते आत्मसाक्षात्कारी आहेत. कारण त्यांचं बोलणं, वागणं, सगळं काही वेगळं असायचं. इतर लोकांसारखं त्यांचं वर्तन नसायचं. त्यांचं लक्ष परमेश्वराशिवाय कुठे नसायचं. नामदेवांनी म्हंटलेले आहे, हे म्हणजे ग्रंथसाहिबामध्ये त्यांचं हे वर्णन आहे. ते अर्थात त्यांनी थोड़ी आपली भाषा घातल्यामुळे ते थोडसं बदललेलं आहे. पण भाषांतरात ते पाहिलं तर ते असं म्हणतात, की आकाशामध्ये पतंग भरारी मारतो आहे आणि मुलगा त्या पतंगाच्या दोरीला धरून उभा आहे. तो सगळ्यांशी बोलतो, खेळतो, पण लक्ष त्याचं सगळ पतंगाकडे आहे. तसं एका साक्षात्कारी माणसाचं असतं. मग दुसरं त्यांनी उदाहरण दिलं की एक गृहिणी आहे, ती घरातलं सगळे काम करते. कडेवर मूल आहे, उठते, बसते, धावावं लागतं कधी, काही उचलावं लागतं , काहीही करावं लागतं, पण लक्ष सगळं तिचं त्या मुलाकडे असतं. तिसरं त्यांनी सांगितलं, की खेडेगावात बायका डोक्यावर तीन तीन कळशा भरून घेऊन चाललेल्या आहेत. आपापसात हसणं चाललंय, बोलण चाललंय, कोणी सासूची गोष्ट सांगते, कोणी सुनेची गोष्ट सांगते. आपापसात बोलतांना सुद्धा त्यांचं लक्ष आणि चालतांना सुद्धा त्यांचं लक्ष घागरीवर आहे. तसेच एका आत्मसाक्षात्कारी माणसाचं लक्ष परमेश्वराकडे असतं आणि असे आत्मसाक्षात्कारी ন

लोक जगात होते, त्यांनी हे शोधून काढलं, की हे अष्टविनायक आहेत. हे आठ विनायक आहेत. हे आठ विनायक कोण? आणि का? त्याचा उलगडा आम्हाला करायला पाहिजे. विनायक म्हणजे शुद्ध शत्ती. पवित्रता, शुद्धता, शुभदायी शक्ती. जिथे शुद्धता असते ती शुभदायी असते. ही शक्ती महाराष्ट्रात हजारो वर्षापूर्वी आधी निर्माण झाली. ती पृथ्वी तत्त्वातून निघालेली आहे. पण आता एखादा दगड वाटला, की हा पृथ्वीतून निघालेला आहे. तर तो ओळखायचा कसा? कशावरून हे स्वयंभू आहेत ? लोक म्हणतात म्हणून, की आम्ही म्हणतो म्हणून! जर तुम्ही सप्तश्रृंगीची देवी बघितली तर अगदी साक्षात् तिच्यावर सगळे दिसतं. चेहरा, डोळे, सगळं काही व्यवस्थित आहे तिला. अशी पृथ्वीतून कशी निघाली ? बरं, मार्कंडेयांनी तिथे देवीची फार सेवा केली होती असं म्हणतात. पृथ्वी फाटून, मोठे असे खडक फाटून त्याच्यातून ती देवी निघाली असं वर्णन आहे. तिथे पाहिलं तर साक्षात् एक चेहरा, अगदी सबंध चेहरा अशी ती उभी, तिचे हात-पाय, सगळे काही व्यवस्थित, शरीर सबंध व्यवस्थित आहे. पण ही कोरलेली तर नसेल किंवा कोणी उगीचच, काहीतरी पैसे कमवण्यासाठी तर तिथे एक देऊळ बांधलं नसेल. त्याचा पडताळा कोणी घ्यायचा. खरं की खोट कसं सांगायचं? आज तुम्ही जाता कारण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं आहे. डोळे मिटून जाता. श्रद्धेने जाता. पण त्याला डोळसपणा नाही. उद्या तुमची मुलं विचारतील, ‘हे काय उगीचच तुम्ही इकडे अष्टविनायक काढलंय. अमकं काढलंय, तमकं काढलंय. कसल्या फेऱ्या काढल्या! कशाला जायचं देवाला?’ आपण लहान मुलांचं जोरात अगदी डोकं दाबून घेतो, गणपतीच्या पायावर, पण त्याला काही अर्थ आहे की नाही! ते विचारतील, ‘ह्याला काय अर्थ आहे. उगीचर्या उगीच आमच्यावर जबरदस्ती कशाला करता ?’ आज नाही तर उद्या. हा प्रश्न उभा राहणार आहे. तेव्हा त्यांना उत्तर काय देणार तुम्ही? की का? तर हे अष्टविनायक जे आहेत, हे पृथ्वी तत्त्वातून निघालेत, हे ओळखलं त्या आत्मसाक्षात्कारी लोकांनी आणि त्यांनी सांगितलं, की हा गणपती आहे. आता हे फारेनचे लोक आले. ह्यांना पूर्वी गणपती, ग पासून काही माहिती नव्हतं. गणपती म्हणून काही देवता आहे, इथून सुरुवात होती. अशी ह्यांची स्थिती होती. गणपती शब्द त्यांनी ऐकला नव्हता. ते त्यांना मी सांगितलं सगळं, की असा गणपती असतो. गणपतीला ही विद्या असते, गणपती म्हणजे शुद्धतेचा साठा, पावित्र्याचा साठा आणि त्याच्यापासून शुभ आणि हित घडतं. म्हणा त्यांची कुंडलिनी जागृत झाली आहे, मग आत्मसाक्षात्कारी झाले. आता बारा वर्ष आम्ही मेहनत केली त्यांच्यावरती. ते इथे आल्याबरोबर त्यांनी जमिनीची माती डोक्याला लावून घेतली. आपण जी तुडवतो. पाय ठेवायच्या आधी ती डोक्याला लावून घेतली. इथे तर म्हणे जमिनीतून चैतन्य निघताहेत. आणि गणपतीच्या तिथे गेल्यावर म्हणायला लागले, की इतकं चैतन्य वहातं आहे, की जशी काही गंगा समुद्राकडे चालली आहे आणि समुद्र पाय धुतो आहे या गणपतीचे. आता जे गणपतीपुळ्यात राहतात किंवा मालगुंडला राहतात, त्यांच्याही लक्षात यायचं नाही. कारण अजून आपली श्रद्धा डोळस नाही झालेली. ह्याला आपण वेदामध्ये बुध म्हणतो. बोध होणे. ती जाणीव आपल्या ह्या नसानसांमध्ये यायला पाहिजे. पूर्वी काही असे आत्मसाक्षात्कारी पुरुष झाले. त्यांनी शोधून काढलं, गणपती कुठे आहे? चैतन्याच्या लहरी येत होत्या, त्या दिशेने आले. अरे, इथे हा गणपती आहे. हा डोंगर. आता आम्हाला ह्या डोंगरातून पुष्कळ प्रकाश

निघतांना दिसतोय. तो कदाचित तुम्हाला नाही दिसणार. कारण आमचे डोळे थोडे सूक्ष्म आहेत. तेव्हा हा गणपती अष्टविनायकातला महागणपती आहे, असं आम्ही म्हणतो. कारण ह्याचे पाय समुद्र, जो की गुरू स्वरूप आहे, धुतो आहे. तो गणपतीचं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठे आहे ? गणपती कुठे बसलेला आहे? आता डॉक्टर लोक डॉक्टरी करतात, पण त्यांना म्हटलं, की गणपती बिघडला म्हणजे पुष्कळसे रोग होतात, तर ते म्हणतील की कोणता गणपती ? घरात जो आमच्या देवात आम्ही ठेवतो तो, का खराच असा काही गणपती आपल्यामध्ये आहे? त्यांना कधी पटायचंच नाही जर सांगितलं तर. पण आता आमच्याबरोबर डॉक्टर्स फॉरेनमधून आले आहेत. २ -४ ५-६ दिल्लीहून आलेत. आलेत आणि त्यांनी बघितलं, की गणपती शक्ती केवढी मोठी आहे. पण ते २-४ मुंबईहून सगळे आत्मसाक्षात्कारी आहेत. जे आत्मसाक्षात्कारी नाहीत त्यांच्यापुढे ‘कालचा गोंधळ बरा होता,’ अशी स्थिती आहे. तेव्हा आत्मसाक्षात्कार हा झाला पाहिजे. त्यासाठी आपण धर्मपालन केलं पाहिजे. म्हणजे धर्मात राहिलं पाहिजे. त्यासाठी सर्व तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. परमेश्वराला आठवलं पाहिजे. संतुलनात राहिलं पाहिजे. आयुष्य निर्मळ केलं पाहिजे. असं सर्वांनी सांगितलं. सर्व साधु-संतांनी सांगितलं. पण आपापसात बोलतांना मात्र, त्यांची भाषा वेगळी होती. गोरा कुंभाराकडे नामदेव आले. तेव्हा ते काय म्हणाले त्याला, ‘निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी,’ आपण म्हणतो पुष्कळदा ही कविता ‘निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी’. म्हणजे त्याला अर्थ काय आहे ? निर्गुण म्हणजे चैतन्य! जे चोहीकडे पसरलेले आहे. ‘त्याला भेटायला म्हणून मी आलो.’ कारण गोरा कुंभार आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांच्यातून ते चैतन्य वहात होतं. पण तुम्ही सगुणात उभे आहात. आता ही गोष्ट आत्मसाक्षात्कारी लोकांशिवाय कोणाला बोलताच येत नाही. सांगताच येत नाही. भाषा वेगळी. तर हा जो भाषेचा फरक आहे, तो चेतनेच्या फरकामुळे होतो. आणि ती चेतना आपली वेगळी झाली पाहिजे. आता एका प्राण्याची चेतना बघा आणि आपली चेतना बघा. एका जनावराची आणि आपली, किती फरक आहे! एखाद्या जनावराला तुम्ही सांगितलं की तू घाणीतून जा. तर त्याला काही वाटायचं नाही, घाण वगैरे. तुडवत जाईल तो. समजा एखादा घोडा असला, कुत्रा असला, त्याला काही वाटायचच नाही. पण आपल्याला कोणी सांगितलं तर जमायचं नाही आपल्याला. आम्ही नाकाला काहीतरी कपडा लावू किंवा जाणारसुद्धा नाही तिकडे तुडवत. घाण तुडवत आपण तिकडे जाणार नाही. आपल्या चेतनेला घाण आहे, चांगले आहे, सुंदर आहे, असुंदर आहे, हे सगळं नजरेत येतं. ते एखाद्या घोड्याला समजत नाही. कुत्र्याला समजत नाही. तसेच हे पाप आहे, हे आहे हे फक्त आत्मसाक्षात्कारी माणसाला कळतं. पण जर कोणाला सांगितलं, की हे पाप आहे, तर तो पुण्य एकतर भीतीने किंवा समजूतदारपणाने ते कार्य करत नाही, पण आत्मसाक्षात्कारी पाप करतच नाही. करूच शकत नाही. प्रयत्न केला तरी नाही करू शकणार. कठीण काम आहे. कारण ते जमतच नाही. तेव्हा ती स्थिती आल्यावरती मनुष्य समर्थ होतो. समर्थ म्हणजे तुमचा जो अर्थ आहे त्याला तो लागतो. त्याला काहीतरी अर्थ येतो. असं समर्थ होण्यासाठी आत्मसाक्षात्कार हा सांगितलेला आहे. तेव्हा आपल्या गणपतीपुळ्याला जे गणपती आहेत, त्यांचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा आधी

आत्मसाक्षात्कारी व्हायला पाहिजे. नाहीतर गेलो देवळात, नारळ दिला ब्राह्मणाने दोन मंत्र म्हटले, आले घरी. ‘जाऊन आलो देवाला.’ अहो, जाऊन आलात म्हणजे काय ? आता इथेसुद्धा, ‘माताजी, दर्शन द्या. ‘ आपल्याकडे ही पद्धत फार आहे. दर्शन. म्हणजे सहा-सहा हजार लोकांनी माझ्या पायावर डोक ठेवलेलं आहे. पाय सुजून जात. अहो, पण देवळात आहेत नां दर्शनाला दगड! दगडाचे पायही आहेत. तिथे दर्शन नि इथे दर्शन , दोन्ही एकच! हे ही दगडच आहेत तुमच्यासाठी आणि ते ही दगडच आहेत. इथे साक्षात् असूनसुद्धा ते दगड आहेत. मग आम्ही तर दगड होणारच. कारण आम्ही आणखीन महामाया. आम्हाला ओळखणं आणखीन त्याहन कठीण आहे. तेव्हा हे सगळ समजून घेण्यासाठी आधी आत्मसाक्षात्कारी होऊन मनुष्य त्या परिस्थितीत पोहोचला म्हणजेच त्याला ह्या गोष्टी समजतील, की खरा साधू कोण आणि खोटा साधू कोण? सगळ्यांनी सांगितलं की , कोकणामध्ये, माताजी, काळी विद्या फार आहे. भयंकर काळी विद्या आहे. त्याच्यात लोक फसतात. ते स्वार्थापोटी म्हणा किंवा अज्ञानापोटी. कोणी गुरू आला बाहेरून आता पुष्कळ लोक जेलमधून सुटले, की कोकणात येतात. भगवं वस्त्र घालायचं आणि फिरायचं. बायकांनी, विशेषकरून, त्यांच्या पायवरती जायचं. दर्शनाला बाबाजीच्या! त्यांनी दंडा मारला, की गेलं एक भूत तुमच्या डोक्यात. मग घरात त्रास, आजार, हे, ते, सुरू होतं. हा एक त्रास आहे. ह्याला आपण म्हणू धर्मवेडे लोक. दुसरा त्रास असा आहे की, वाचन! वाचत रहायचं. त्यावर कबीरदासांनी म्हटलंय, ‘पढी पढी पंडित, मूरख भय’. ते मला अगदी साक्षात् झालं. विशेषकरून फॉरेन कंट्रीजमध्ये. तिथले जे पंडित लोक आहेत त्यांनी गीता वाचून टाकली. वेद वाचून टाकलंय. हे वाचलं , ते वाचलं. आणि साक्षात् जेव्हा काही म्हटलं, तर काय माहीत? तुलसीदासांनी म्हटलेलं आहे, ‘चित्रकुट के घाट पर, भरी संतन की भीड, तुलसीदास चंदन घिसे, तिलक करत रघुवीर’. तर रघुवीरांना, जसे सगळ्यांना टिळे लावत होते तसं रघुवीरांना लावलं आणि चला पुढे. ओळखलं नाही त्यांना. सबंध एवढं मोठं रामायण लिहन फायदा काय त्याचा! तुलसीदासांनी श्रीरामांना ओळखलं नाही आणि त्यांच्या कथेत श्री हनुमान येऊन बसले होते. त्यांना ओळखलं नाही. तर फायदा काय त्या लिहिण्याचा! तेव्हा हे सगळे करून जर परमेश्वराला आपण ओळखू शकत नाही, त्यांचं तत्त्व आपल्याला मिळत नाही, तर काही फायदा नाही. म्हणजे असेच आहे, की जी जीभ आहे त्याला चवच नाही. काही खाल्लं तरी दगडच आहे तो. तर ही चेतना जी आहे, ज्याला आपण आत्मसाक्षात्कारी चेतना असं म्हणतो, ती आपल्यामध्ये जागृत करून घेण्यासाठी फक्त कुंडलिनीचं जागरण झालं पाहिजे, असं अनादिकाळापासून म्हटलेलं आहे. पण त्याला पर्याय लोकांनी शोधून काढला. कारण शेवटी ज्ञानेशांना असं वाटलं, की आता कसंतरी करून हे सांगितलेच पाहिजे. त्याच्याशिवाय हे कार्य होणार नाही. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं सहाव्या अध्यायामध्ये, की कुंडलिनी नावाची जगदंबा आहे. तिला चक्रवर्तीची शोभा आहे. व्यवस्थित वर्णन केलं. तर त्याच्यावर पर्याय असा काढला, की सहावा अध्याय वाचायचाच नाही मुळी. म्हणजे जे वाचायचं होतं तेवढच बरोबर वाचायच नाही. बाकी आपली पारायणं करत रहायची. कारण ज्ञानेश्वर ही एक माऊली आहे. तेव्हा त्यांचं जे मुख्य आहे, त्यातलं जे मुख्य बाळ आहे, जे त्यातलं मुख्य तत्त्व आहे, त्याला हात नाही घालायचा. बाकी वाचत रहा. तेव्हा त्याचेही प्रयत्न मला वाटतं एक अर्थी पुष्कळच कमी करण्यात आले आणि कुंडलिनीबद्दल बोलायचंसुद्धा मुश्किल झालं. सुरुवातीला

मी कुंडलिनीचं नाव घेतलं की लोक दचकायचे. ‘माताजी, हे काय? सहावा अध्याय वाचायचा नाही आम्हाला सांगितलंय.’ ‘अहो, पण नाही. कोणी सांगितलं तुम्हाला वाचायचा नाही म्हणून?’ ‘नाही. आम्हाला असं सांगितलं.’ ‘कोणी? कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे, ते सांगा. जर वाचायचं नव्हतं तर तो लिहिला कशाला मग?’ असे अनेक तऱ्हेचे प्रकार आपल्या समाजात सुरू झालेले आहेत आणि त्यालाच मी म्हणते, धर्मवेडे लोक आहेत आणि असा धर्मवेडेपणा करून कोणाचाही परमेश्वरावर विश्वास रहाणार नाही आणि तुमच्यावरही विश्वास रहाणार नाही. तेव्हा इकडे गुरूंचे, नंतर एक काळी विद्या. त्यानंतर आपण म्हणू धर्मवेडेपणा हा एकीकडचा. दुसरीकडे शिकून शिकून अतिशहाणे झालेले लोक, त्यांचे बैल रिकामे फिरताहेत. तशातले लोक आणखीन आपल्या देशात राहतात. आणि तिसरे असे आहेत, की ज्यांचा देवावरच विश्वास नाही. खुलेआम म्हणतात. किर्लोस्करमध्ये माझ्यावर टीका आली, की बाई शिकून सवरून देवावर विश्वास ठेवते. म्हणजे मी फार वाईट आहे, असं त्यांच्या मते. कारण त्यांचा देवावर विश्वास नाही, किर्लोस्करांचा वरगैरे मला वाटतं. पण मी असं म्हणते, की अहो, तुम्ही देवाला पाहिलं आहे का ? त्याला जाणलं आहे का? मग तुमचा विश्वास नाही असं ठाम मत तुम्ही कसं करून घेतलं ? ही काही शास्त्रीय पद्धत नाही झाली. सायंटिफिक पद्धत नाही झाली, की तुम्ही न बघता, न विचारता, न जाणता एकदम अस टिकास्त्र सोडलं. कितीही म्हटलं तरी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्या इथे हजारो वर्षापासून ज्या परमेश्वराचं गुणगान गायलं गेलं आहे, ज्या संतांनी त्याचं वर्णन केलं, ते काय एकजात सगळे काय खोटे होते ? वाईट होते ? त्यांनी कोणता वाईटपणा केला का? त्यांनी कोणतेही वाईट कार्य केले का? आपल्या देशातले पुष्कळसे असे लोक आहेत, की जे फार शिकलेले, पैसेवाले, वगैरे असे दुसरा आहेत आणि मोठमोठ्या राजकारणात फिरतात, वावरतात आणि स्पष्ट सांगतात, की आमचा देवावर विश्वास नाही. आमच्या लंडनला एक आले होते अॅम्बॅसिडर म्हणून. तिथे आहेत कमिशनर. तर मला आमच्या एका सहजयोग्यांनी येऊन सांगितलं की, ‘तो तिथला वर्तमानपत्रकार होता. आम्हाला आश्चर्य वाटलं माताजी, आम्ही त्यांना भेटायला गेलो, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की माझा देवावर विश्वास नाही. ते महाराष्ट्रीयन आहेत, ब्राह्मण आहेत परत. ‘माझा देवावर विश्वासच नाहीये. आम्हाला माहिती आहे म्हणे. आम्हीच, ब्राह्मणांनी देव बनवलेला आहे. देवाला काही अर्थ नाहीये. म्हणून आम्ही खरे लोक आहोत. आम्ही स्पष्ट सांगतो की ब्राह्मण जे आहेत ते खोटे आहेत. खोटं सांगतात हे भटजी लोक. आम्ही भटजी नाही. आम्हाला देवावर पैसे नाही कमवायचे. आम्ही खरं सांगतो म्हणजे देवच नाही.’ म्हणजे दोन्ही एकच आहे मला वाटतं. हे पैसे कमवतात आणि तुम्ही नाव कमवता. तुम्ही कोण म्हणणारे, आमचा देवावर विश्वास आहे किंवा नाही? तुम्ही जाणलं आहे का काही ? पाहिलं आहे का काही? हे म्हणजे आमच्या आजीसारखं आहे , की जेव्हा चंद्रावर लोक गेले, तिला सांगितलं की, ‘लोक आता चंद्रावर गेले. ‘ ‘काहीतरी खोट सांगू नका म्हणे. असच काहीतरी बनवून केलं असेल, चंद्र वगैरे, असाच गमतीचा आणि म्हणे चंद्रावर गेले.’ तशातला प्रकार आहे हा! अहो, जे गेले ते गेले. दाखवलं जरी त्यांना टेलिव्हिजनमध्ये तरी विश्वास ठेवायला तयार नाहीत. ते म्हणे काहीतरी नाटक केलेलं आहे तुम्ही!

असं शक्यच नाही. चंद्रावर कसे जाणार लोक? तशातला हा प्रकार! तेव्हा आपल्या समाजात असे लोक पुष्कळ आहेत. जे नावासाठी देवाला नाव ठेवतात. उर्दमध्ये आहे नां, ‘बदनाम ह्ये तो क्या नाम न हुआ!’ म्हणून आम्ही नास्तिक म्हणून मिरवायचं! आम्ही नास्तिक आहोत. तेव्हा अशा तऱ्हेचे जे लोक आहेत, त्या लोकांमुळे आपल्याला फार त्रास झालेला आहे. तेव्हा लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, की परमेश्वर हा आहे आणि जे संत- साधू सांगून गेले, ते सगळं सत्य आहे आणि जे आपल्या शास्त्रात लिहिलं आहे, ते अतिसत्य आहे. दुसरी गोष्ट, आपले भारतवर्ष ही एक योगभूमी आहे. ही महान योगभूमी आहे. तेसुद्धा ओळखण्यासाठी आपल्याला आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील, ‘माताजी, ही जर योगभूमी आहे, मग इथे इतकं दारिद्र्य का? इथे इतकी गरिबी का?’ प्रश्न बरोबर आहे. जर योगभूमी आहे, तर इथे ऐश्वर्य नांदलं पाहिजे. सुखसमाधान नांदलं पाहिजे. तसं काही दिसत नाही. त्याला कारणं दोन आहेत. पहिलं तर कारण हे आहे, की कृष्णाने सांगितलं आहे ‘योगक्षेमं वहाम्यहम्’. त्यांनी सांगितलं, की आधी योग झाला, तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालात म्हणजेच क्षेम होणार आहे. ही योगभूमी आहे. म्हणजे जसं समुद्रावरती पक्षी नेहमी तहानलेला राहतो, तसेच आपण ह्या योगभूमीत तहानलेले आहोत. ही योगभूमी आहे, पण योग घेतला का तुम्ही? योग म्हणजे त्या परमेश्वराशी संबंध झाला का तुमचा? की इकडेतिकडे भरकटले आहात! जर झाला तर क्षेम होईल. सुदामाला कृष्णाला भेटायला जावं लागलं. त्याची भेटगाठ घ्यावी लागली. त्याच्यानंतर त्यांना क्षेम, लाभ झाला. तसेच ज्या दिवशी योग घटित होईल, त्याच्यानंतर क्षेम लाभ होतो. त्याला कारणं आहेत. तेव्हा तो क्षेम लाभ झाला पाहिजे. तो न झाल्यामुळे आता आपण हे म्हणायचं की, ‘जर आमची योगभूमी तर आम्हाला इथे क्षेम लाभ का नाही?’ अहो, इतका क्षेम लाभ होणार आहे, पण आधी तुम्ही योगात तर उतरा! आता हे बघायचं, की हे लोक हजारो मैल दुरून येतात. कुठे? तुमच्या गणपतीपुळ्याला. कॅनडाहून लोक आले. किती हजार मैल आहे, मला माहीत नाही. पण वीस एक हजार मैल तरी असेल इथून. तिथून मंडळी तुमच्या गणपतीपुळ्याला येतात. पण आपल्या इथले, जवळचेच, अजून रत्नागिरीतून किती आले असतील, देवाला ठाऊक! कारण ‘उद्या माताजी इथे येणार आहेत अनायसे, तर तिकडे बघून घेऊ. देखल्या देवा दंडवत ! चला, माताजी येतातच आहेत ! मग चांगलं आहे.’ ही दसरी प्रथा. देवाकडे आपलं लक्ष जे आहे ते गहन नाहीये. देवाला एक पैसा दिला, सव्वा पैसा दिला, आजकाल सव्वा रुपया देतात फार तर. झालं! मग, ‘गणपती, तू माझं हे करून दे, तू माझं ते करून दे. माझं हे बरं झालं पाहिजे. माझी मुलं बरी झाली पाहिजेत. माझ्या वडिलांना बरं वाटलं पाहिजे. मला पैसे मिळाले पाहिजेत. सगळं केलं पाहिजे तुम्ही. कारण मी सव्वा रुपया तुला दिला. मुद्दामून मी आलो तुला द्यायला.’ तेव्हा तो कॅश झाला पाहिजे नां पैसा! आणि तो देवाला समजतच नाही. सव्वा रुपया देवाला समजतच नाही. रुपया कशाशी खातात ते समजतच नाही. तर समजतं काय? तर योग समजतो. योग म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जाणे. जो त्यांच्या साम्राज्यात नाही त्याला काय अधिकार आहे ? उद्या तुम्ही जर इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिलं, की बघा, आमच्याकडे ५-७ मुलं आहेत. मला इतके पैसे पाठवा. तर पाठवेल का ती? ती म्हणेल, का? तुम्ही काय ब्रिटीश आहात का ? तुमचा काय अधिकार? तसेच परमेश्वरसुद्धा विचारणार, काहो, तुमचा काय अधिकार, तुम्ही सव्वा रुपया दिला तर त्याचे मी तुम्हाला इतके रुपये द्यायला ?

तुमचा अधिकार काय? तो अधिकार मिळवणं, हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जसा टिळकांनी त्या वेळेला स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार सांगितला, तसा हा ही तुमचा सूक्ष्मातला जन्मसिद्ध अधिकार आहे, की तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात यावे, आणि त्याचे नागरिक व्हावे. हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो मिळवला पाहिजे. आता शिवाजी महाराज हे आत्मसाक्षात्कारी होते. कारण त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं, ‘स्व’ चा धर्म ओळखावा. स्व, ‘स्व’ म्हणजे कोण? आत्मा! आत्म्याचा धर्म ओळखला पाहिजे. स्व चा धर्म ओळखावा असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता त्याचा अर्थ असा झाला आहे, की ब्राह्मण, ब्राह्मणेतर भांडण, मग त्याच्यात ब्राह्मणात ब्राह्मणाची भांडणं. मग ह्यांची त्याच्यात भांडणं. काय म्हणे आम्ही धर्मासाठी भांडतो आहे म्हणजे धर्मात भांडण करणं कुठे लिहिलं आहे, हे मला माहिती नाही. अधर्म आणि धर्माचं भांडण होऊ शकतं. पण धर्मातल्या धर्मात भांडणं झाली तर त्या धर्माला काही अर्थ आहे का? मग उद्या तुमची मुलं म्हणायची की आम्ही कम्युनिस्ट होतो. आमचा ह्यावर काही विश्वास नाही. फालतूच्या गोष्टी आहेत सगळ्या ह्या! त्यांना तुम्ही थांबवू शकत नाही. म्हणजे सिद्ध झालं पाहिजे. परमेश्वर सिद्ध करण्याचा मार्ग एकच आहे, की तुमच्यातला जो परमेश्वर आहे, तो जागृत करून त्यांना दाखवला पाहिजे. तेव्हाच तो सिद्ध होणार आहे! नुसते भागवत वाचून, पारायणं करून तो सिद्ध करता येत नाही. उपास-तापास करून करता येत नाही. हे आता आपण पाहिलं आहे. आपल्या वाडवडिलांनी केलं आहे. त्यांच्या वाडवडिलांनी केलं आहे आणि वारसाच आहे आपल्याला तो उपवासाचा. उपवास करतोच कशाला आपण ? उपास करायची काही गरजच नाही. उपासमारीने इतके लोक मेले. ते काय देवाकडे गेले का? अहो, उपास कशाला करायचा? तसेच उपवासाने लोक मरताहेत. उपास करायचा. शरीराला त्रास द्यायचा. काहीतरी आजार लावून घ्यायचा. नाही तर देवाच्या नावावर लाडू खात बसायचे. दोन्ही एकच प्रकार आहेत. तेव्हा परमेश्वर ही सूक्ष्म शक्ती आहे आणि ती आपण मिळवली पाहिजे. सूक्ष्मात आपण उतरलं पाहिजे. त्यासाठी आपण सूक्ष्म झालं पाहिजे. आपण आत्मास्वरूप झालं पाहिजे. हे ह्याच्यातलं सगळं तत्त्व आहे. ते तत्त्व धरलं पाहिजे. तत्त्वात उतरलं पाहिजे आणि तत्त्व म्हणजे तुमची कुंडलिनी आहे. ही आदिशक्ती तुमच्यामध्ये साडेतीन वेटोळे घालून त्रिकोणाकार अस्थीमध्ये बसलेली आहे. तिच्या खाली गणेशाचं तत्त्व आहे. तो तिचा मुलगा आहे. तो कोणालाही जाणत नाही. आपल्या आईशिवाय आणि त्याच्यामध्ये जी निष्पाप, पवित्र शक्ती आहे, त्या शक्तीच्या दमावरच कुंडलिनी उठते. तुम्ही निष्पाप नसले, समजा तुमचं हृदय घाणेरडं असलं, उद्या जर हिटलर म्हणेल की माताजी, तुम्ही मला आत्मसाक्षात्कार द्या. तर मी करू शकेन का? शक्य नाही. पुष्कळशा लोकांना होत नाही साक्षात्कार. अहंकारी लोक असतात त्यांना होत नाही. मी स्पष्ट सांगते, हे आमच्या हातात नाही. क्षमा करा आम्हाला. तुम्ही कुठे दुसरीकडे जा. आमच्या हातातलं नाही. मनुष्याला अहंकार असला, की तो पार होणं शक्यच नाही. एखाद्या माणसाच्या हृदयात खोटा भाव असला, तो पार होणं शक्यच नाही. आम्ही कितीही हात चालवले तरी करणार काय? खोट नाणं ते खोट नाणं. ते चालतच नाही. परमेश्वर ओळखतो नां! कुंडलिनी तुमची स्वत:चीच ह्याचा जबाब देते. तर ही जी शुद्ध इच्छा तुमच्यामध्ये आहे, ती एकच आहे, की आम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आणि ০

योग मिळवायचा. जिवा-शिवाची गाठ झाली पाहिजे. हीच एक शुद्ध इच्छा आहे. बाकीच्या तुम्ही सतरा इच्छा कराल, आज घर बांधाल, उद्या हे कराल, परवा ते कराल. पण तुमच्या सर्व इच्छा काही तृप्त होणार नाहीत. सर्व इच्छा तृप्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे शुद्ध इच्छेच जागरण. म्हणजे कुंडलिनीचं जागरण. आता महालक्ष्मीच्या देवळात बसून आपण ‘उदे, उदे अंबे’ म्हणतो. आता परवाच इथे गोंधळ झाला होता. गोंधळ म्हणजे कलियुग ! आणि त्याच्यामध्येच होणार आहे हे कार्य. ‘उदे, उदे अंबे’ आपण का म्हणतो महालक्ष्मीच्या देवळात? आता महालक्ष्मी म्हणजे काय इथून सुरुवात करूयात. म्हणजे मधली सुषुम्ना नाडी ही महालक्ष्मी. जिने आपण एका अमिबापासून माणूस झालो ती सुषुम्ना नाडी. तिला पॅरासिंपरथॅटिक नव्हस सिस्टीम असं म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे त्यांना अर्धवटच माहिती आहे म्हणा! नुसती नाव द्यायची. पॅरासिंपथॅटिक, पॅरा म्हणजे, पलीकडची. म्हणजे काय पलीकडे, कशाच्या पलीकडे? मीसुद्धा डॉक्टरी शिकले तर मला हसायला यायचं ह्या लोकांचं! ऑटोनॉमस नव्व्हस सिस्टीम, म्हणजे स्वयंचालित. अहो, पण स्वयं म्हणजे कोण? नाव द्यायचं स्वयंचालित. जसं मोटारीला एक ड्रायव्हर लागतो, तसा स्वयं एक आहे. पण तो स्वयं आहे कोण? ते तर बोला! हे झालं इंग्लिशच ज्ञान. तर ह्या सुषुम्ना नाडीमध्ये, महालक्ष्मीच्या देवळात बसून आपण, ‘अंबे’ला का म्हणतो? अंबे कोण आहे ? अंबा, हीच कुंडलिनी आहे. तिला ‘जागृत व्हा, ‘ असं म्हणतो आपण. परंपरागत, हजारो वर्षापासून, आपल्या रोजच्या भाषणातसुद्धा आपण हे म्हणतो. ‘भरीन बोधाची परडी’ म्हणतो ना आपण ! जोगवा, आईला मागतो ना जोगवा दे. जोगवा म्हणजे काय पैसे मागणं झालं ? पुष्कळ लोक जोगवा म्हणून हात असे करून, जोगवा दे आई, जोगवा द्या, असे मागतात. म्हणजे पुरुषांनी म्हणायचं, ‘आई जोगवा द्या.’ भीक मागणे हा जोगवा नव्हे. जोगवा म्हणजे योग. आईला मागायचा असतो योग. मोदींनी सांगितलं की माताजींना जे मागायचं तो आहे योग. तो मिळवून घ्या. तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये खरोखर जर शुद्धता असली जशी ह्या पाश्चिमात्य लोकांच्यात आहे. त्यांची बुद्धी शुद्ध झाली आहे. निव्वळ शुद्ध बुद्धी आहे. त्याला कारण सगळे करून पाहिलं. काही त्याच्यात अर्थ नाहीये. राम नाही. सगळं झालं. ड्रग घेऊन पाहिले, भुतं बनून पाहिले, उपास करून पाहिले. सगळं करून पाहिलं. काही त्याच्यात परमेश्वर मिळालेला नाही. शेवटी मग आता आले रस्त्यावरती. तेव्हा बुद्धी अगदी स्वच्छ होऊन जाते. ज्याची बुद्धी अगदी पवित्र आहे, तो मनुष्य चटकन सहजयोगात उतरतो. ज्याच्या बुद्धीवर अहंकाराचा पडदा आहे, तो उतरू शकत नाही. गीता वाचली तर लोक व्यास होत नाही. कोणतेही पुस्तक वाचून, पारायणं करून कोणी दत्त होत नाही. लोकांनी पारायणं करायची आणि घरी जाऊन चोऱ्या करायच्या. कारण असं आहे, की परिवर्तनाला एकच गोष्ट कारणीभूत होते, आणि ती म्हणजे कुंडलिनीचं जागरण. जोपर्यंत कुंडलिनीचं जागरण होत नाही, तोपर्यंत माणसामध्ये आमूलाग्र परिवर्तन होऊ शकत नाही. वरवर होईल. आज जर तो बटाट्याची भाजी खातो, तर उद्या मेथीची भाजी खाईल फार फार तर. आज जर रेशमी कपडे घालतो, तर उद्या खादीचे घालेल. त्याने काय होणार आहे ? पुष्कळसे खादीचे कपडे घातलेले आपण बघतोच आहे कसे वागतात ते. सगळं बाह्यातलं आहे. अंतरंगामध्ये अंतर्योग घटित झाला पाहिजे आणि ती कुंडलिनी जागृत झाली पाहिजे. त्याला काही दुसरं अवधान नको.

पुष्कळांचं असं म्हणणं आहे, की माताजी, ह्याला पुष्कळ स्वच्छता करावी लागते. काही असतं, हे असं आहे, तसं आहे. कबूल! तुम्ही केली पूर्वजन्मात. आता सर्व सुकृतांचे फळ घ्या तुम्ही. जे म्हटलं, ‘अवघाची संसार सुखाचा करीन.’ अरे बाबा, कसा करणार तू! ते तर लिहिलेच नाही. कारण लिहिलं असतं तर त्याला लोकांनी मानलं नसतं. पसायदान आपण वाचलेलं आहे. त्यांच्यात जे वर्णन आहे, ते म्हणजे आजचा हा सहजयोगच लिहिलेला आहे सबंध! ‘दुरितांचे तिमिर जावो,’ कसं जाणार? ‘जो जे वांछील तो ते लाहो,’ कसं ? तो मार्ग काय? कम्युनिझम घेतला काय? कोणताही ‘इझम’ घेतला, तरी ज्याला आमचे इथे म्हणतात, हे असं करा, असं करा, असं करा. ते होणार कसं? त्याच्यासाठी जबरदस्तीच करावी लागणार, जुलूम करावा लागणार. होणार कसं? होण्यासाठी काहीतरी आतून व्हायला पाहिजे. म्हणजे आपला आत्मा आपण मिळवला पाहिजे आणि तो एकदा आपल्या चित्तात झळकला, म्हणजे बघा, केवढी शक्ती आपल्यामध्ये येते! बलवत्तर होतो आपण आणि त्या शक्तीचं स्वरूप म्हणजे प्रेमस्वरूप आहे ती शक्ती. आजपर्यंत आपण प्रेमाची शक्ती कधी वापरलीच नाही. कोणतेही तुम्ही बघा, मोठेमोठे व्यवस्थापक असतात, संस्था करतात. काय तर म्हणे आता आम्ही हे गावातले जेवढे गुंड आहेत त्यांना मारून टाकतो. गुंड म्हणजे स्वत:च असतील. अशी काहीतरी एक संस्था काढायची ज्याने दुसऱ्याचं नुकसान कसं करायचं? म्हणजे हजारो लोक एकत्र होतात. आमचे केस पांढरे आणि तुमचे केस पांढरे. सगळ्या पांढर्या केसाच्या लोकांनी एक क्लब करायचा. बाकीच्यांचे काळे आहेत त्यांना मारत सुटायचं. कोणतंही कारण शोधायचं. कोणत्याही बहाण्याने करत रहायचं. आता इंग्लंड, अमेरिकेला मी पाहिलं, स्वत:ला ते गोरे म्हणवतात, इतरांना ते रंगदार म्हणतात. म्हणजे आपण सगळे रंगदार लोक आहोत. म्हणजे काहीतरी परमेश्वराने जर वैचित्र्य घातलं नसतं, तर संसारात , सृष्टीमध्ये कधीच आनंद आला नसता आणि सौंदर्य आलं नसतं. पण त्याच गोष्टीला ज्या गोष्टी अत्यंत सुंदर आहेत, ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्याच गोष्टीला धरून भांडणं करायची. वैमनस्यावरतीच आपलं सगळे उभारलेलं आहे आणि म्हणून ते कोलमडून पडतं. सायन्स तरी कशाला ? तर म्हणे अॅटमबॉम्ब . तुम्ही बनवा आणि आम्ही ही बनवतो आणि भांडूयात, शेवटपर्यंत. एक जर का अॅटमबॉम्ब पडला इकडे, तर गेले, इकडेही गेले, तिकडेही गेले. अमेरिकाही गेली आणि रशियाही जायची. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे, की हा जो सबंध खेळ चालला आहे, वैमनस्यामुळे आहे. ज्या ज्या संस्था वैमनस्याला वाढवता आहेत, त्या मग राजकारणी असो, सामाजिक असोत किंवा कोणत्याही नावाने फिरत असल्या, देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, जे वैमनस्य पसरवतील, त्या कधीच चालणार नाहीत. जे प्रेम पसरवतील, त्याच चालणार आहेत. पण ह्या प्रेमाला केवढी शक्ती आहे, हे आपण जाणलं पाहिजे. फार सूक्ष्म शक्त्या आहेत. जेव्हा ह्या प्रेमाचं साम्राज्य येईल, कोणीही आजारी राहणार नाही. कोणताही संताप होणार नाही. भांडणं होणार नाहीत. सबंध आनंदीआनंद होऊन सगळे सुखात रममाण होतील. समाधान सगळ्यांना, संतोषामध्ये. हे असं झालं पाहिजे, असं सगळ्या साधु-संतांनी सांगितलं आहे. आणि त्याची पूर्ती करण्यासाठीच ते सहजयोग आज उभा झालेला आहे. आता त्यात आपला किती भाग आहे, आपल्याला किती मिळणार आहे, आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे सहजयोगावर काही उपकार नाहीत, गंगा वहाते आहे, त्यात आपणच आंघोळ

करून घेतो असं समजायचं आहे. काही देणं-घेणं लागत नाही. मी आई आहे. आईने आईचं काम केलेच पाहिजे. ही पृथ्वी आहे, तिला आपलं काम केलेच पाहिजे. तिच्या पोटी जर तुम्ही चार बी घातले तर त्यांना तिने उगवलंच पाहिजे. ते तिचं कार्यच आहे. तर मी कुंडलिनीचं जागरण करते त्याच्यात काही विशेष नाही. ते मला केलेच पाहिजे आणि ते होतेच. पण पुढची जोपासना, ते सांभाळणं आणि ते व्यवस्थित बसवणं, ते समजून घेणं ते मात्र तुम्हाला करायला पाहिजे आणि त्याला काहीही वेळ लागत नाही. मोदी म्हणतात कबूल आहे, ह्यांना बोट धरून… कारण हे ह्यांना पार होऊन आज चौदा वर्षे झाली. तेव्हा सुरुवातीला बाराच माणसं होती. त्यांना बोट धरूनच चालवावं लागलं. पण आज हजारो फुलं ही फळं व्हायच्या मार्गाला आली आहेत. ह्यांना काही हात धरून सांगायला नको. फक्त हे की आता आमचं हे आत्मसाक्षात्काराचं जे अंकुर जन्माला आला आहे, त्याची जोपासना कशी करायची? आणि त्याची इज्जत कशी करायची ? त्याचा मान कसा ठेवायचा? एवढेच जर लक्ष ठेवले तर मनुष्य ह्या बी स्थितीपासून वृक्ष स्थितीला पोहोचायला काहीही वेळ लागणार नाही. आणि मग अशा पवित्र वातावरणात तर काही विचारायलाच नको. पुढच्या वर्षीसुद्धा आमचा येण्याचा विचार आहे. पण नेहमी आम्ही गेल्यावर उपटसुंभ काहीतरी काढतात. इथून जेव्हा आम्ही जाऊ, तुम्ही बघा! काही ना काहीतरी सांगत बसतील. अंगापूरला आमचा फार मोठा प्रोग्रॅम झाल्यावर तिथे लोकांनी असं सांगितलं, की माताजींच्या अंगावरती एक बॉम्बगोळा टाकला. अमकं झालं, तमकं झालं, म्हणजे काही झालं नाही हं हे. स्वप्नात झालं असेल त्यांच्या तर झालं असेल. मी आश्चर्यचकित झाले, की या गोष्टी आल्या कुठून. कारण त्यांच्या पोटावर पाय आला . कारण मी म्हटलं देवाच्या नावावर पैसे घ्यायचे नसतात. देवळाला ठीक आहे. देवळाला पैसे लागतात ते ठीक आहे. पण आपला चरितार्थ तुम्ही त्याच्यावर चालवता तेवढे ठीक आहे. पण त्याच्यावर तुम्ही मोटारी घ्याल, घरं घ्याल, अमकं घ्याल, लोकांना लुटाल तर ते चालणार नाही. चरितार्थसुद्धा साधला पाहिजे तो दुसर्याच मार्गाने. देवाच्या नावावर कधीही संतांनी पैसे घेतले नाहीत. कुठेच, कोणत्याच देशात, कोणत्याही धर्मात नाही. (जे खरे संत आहेत.) तेव्हा जे तुमच्याकडून पैसे आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. एकही पैसा कोणी मागितला तुम्ही अगुरू घेतात, ते गुरू नाहीत, ते अगुरू आहात असं समजायचं. आणि योगाशिवाय तुम्हाला हे कळणारसुद्धा नाही, की कोण किती खोटा आहे. काय तुमच्यात दोष आहे ? कारण तुमच्यात जेव्हा ती चेतना जागृत होते, तेव्हा तुम्ही बोटांवर सांगू शकता. ह्या बोटांवर तुम्ही सांगू शकता की ह्याची कोणती चक्रं धरली आहेत, ह्याला काय पकड आहे, ह्याला काय झालेलं आहे ? कारण नीर-क्षीर विवेक तुमच्यात आपोआपच, आतूनच, तुमच्या नसानसात येतो. हे इथे सगळ्यांचं झालं पाहिजे. ह्या महागणपतीच्या कृपेमुळे तुम्ही इथे आलात. विशेष काहीतरी असेल. काहीतरी सुकृत विशेष असल्याशिवाय, पूर्वपुण्याई असल्याशिवाय अशा पवित्र स्थानी माणसाचा जन्म होत नाही. मला कोणी म्हटलं तर मी गणपतीपुळ्याला आयुष्यभर आरामात राहू शकते. पण कोणी मला सोडणार नाही हो! इथे मला दोन दिवससुद्धा कोणी राहू देणार नाही. आयुष्यभर मी राहिले असते. इतकी आनंदाची ही जागा आहे. तेव्हा हा आनंद जो इतका वाहतो आहे, तो तुम्ही घ्यावा. आत्मसात करावा आणि प्रेमाने नांदावं. आम्ही पुढच्या वर्षी नक्की येऊ. परत येऊ. तुम्हा सगळ्यांना भेटू आणि बघू.

आता प्रश्न असतील तर विचारा. मी गेल्यावर मग काहीतरी खुसपटं काढत बसायची. हे आपलं एक विशेष, हिंदुस्थानी लोकांचं वैशिष्ट्य आहे. पाठ फिरली की अरे, त्यांचं असं होतं . ते आम्ही पाहिलं आहे. रोजचेच असते. तेव्हा काय असेल ते आत्ता तोंडावर विचारा. काय असेल ते सध्या विचारून घ्या. आता इथे पुष्कळशा मंडळीना भाषासुद्धा समजत नाही, पण ध्यानात आहेत. मराठीत बोललं काय किंवा कशात बोललं काय, मंत्रच आहेत. माताजी, आम्हाला व्हायब्रेशन्स येताहेत. बसलेत ऐकत. काय ऐकता ? विचारा. ‘काही नाही. आमची कुंडलिनी जागृत आहे. आम्ही आपलं आनंदात बसलो आहे. आनंद घेतो आहे. माताजी, काव्यगायन करताहेत त्यांच्या मते. असला प्रश्न तर विचारावा, कृपा करून. विचारा प्रश्न. अशा रीतीने विश्व धर्म स्थापन होणार आहे आणि विश्व धर्मामध्ये सर्व धर्मांचा मान आहे. कारण सांगतो म्हणून नाही. पण होतोच. कारण आपल्याला कळतं की सर्व धर्मांमध्ये जे मोठेमोठे झाले, ते सगळे आपलेच होते. आपण उगीचच भांडत होतो. हे आपण जाणतो म्हणून. उगीचच नाही. बुद्धीवाद नाही त्याच्यात काही. जातपात नाही. हंडा वगैरे ह्या सर्व गोष्टी सोडाव्या लागतात आणि हे सुटतात. झटकन सुटतात. दारूच व्यसन, व्यसन, ते व्यसन एकदम सुटून मनुष्य एकदम समर्थ होऊन जातो. मग, ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ?’ हे सगळं जे वर्णन झालेलं आहे, ते साक्षात् ते तुम्हाला दिसलं पाहिजे. त्याचा तुम्ही आनंद उचलला पाहिजे. आता प्रश्न विचारून घ्या, असला तर, परत नाही तर गेल्यावरती नको. आता ह्या पवित्र स्थळी खरोखरी ही घटना अगदी क्षणात व्हायला पाहिजे. आणि सोपं काम आहे. डोळे मिटून हे करावं लागतं. आधी मी सांगते. आधी आपण आपल्याला संतुलन आहे की नाही ते बघायचं. म्हणजे काही लोक असतात ते भावनाशील असतात. काही लोक असतात ते बुद्धीवादी असतात. त्यांच्यामध्ये संतुलन यायला पाहिजे. तेव्हा आधी आपण डावीकडचं संतुलन साधतो. तेव्हा डावा हात असा माझ्याकडे करायचा आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा. आता सध्या डोळे नाही मिटले तरी चालतील. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. पुरुषांनी टोप्या काढाव्यात. कारण ब्रह्मरंध्र छेदन आहे आणि आईकडे टोप्या कशाला पाहिजेत! आईचा हात डोक्यावरच असतो नेहमी. डावा हात असा माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. करा, करा. आपणही करा. सगळ्यात पुढे बसून नाही केलं तर ते बरं दिसत नाही. डावा हात माझ्याकडे करा. असा. नाहीतर आपण जावं ते बरं. कृपा करून. डावा हात माझ्याकडे करा आणि उजवा हात जमिनीवर. ज्यांना हे करायचं नसेल त्यांनी कृपा करून जावं. कारण इथे त्रास होतो आम्हाला. आता इकडे लक्ष ठेवा. अशीच मंडळी खराबी करतात. पण अंगातून गरम गरम लाह्या निघत होत्या. सांगावं कोणी? अशा लोकांपासून जपून राहिलं पाहिजे. वेगळं राहिलं पाहिजे. सुरुवातीला. नसते विचार तुमच्या डोक्यात भरतील आणि असा प्रश्न विचारतील की, काहो, तुम्ही आमचं काय भलं केलं? तुम्ही कशाला आम्हाला सांगता? अशी जी मंडळी आहेत त्यांना विचारायचं, तुम्ही आमचं काय भलं केलं? आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर. ज्या मंडळींना जायचं असेल त्यांनी जावं. असा ठेवा. आता हे परत संतुलन आहे. म्हणजे जे लोक

बुद्धिवादी आहेत, फार विचार करतात, त्याच्यामुळे जे आपल्या डोक्यात काहूर आहे, ते काढण्यासाठी म्हणून हे असं संतुलन असतं. आता बघा कसं वाटेल ते. असा हात. शहाणपणा धरायचा. आता दोन्ही हात माझ्याकडे करा. आता असं बघायचं हातामध्ये गार गार येतंय का काही ? उजवा हात डोक्यावर, इथे ठेऊन. गार येतंय डोक्यातून? बघा, इथे, टाळूवरती आलं पाहिजे गार. तर त्याला काही अर्थ आहे. टाळूवर बघा येतंय का? आता, ‘माझं असं चुकलं, माझं तसं चुकलं, मी हे खोटं केलं.’ तसं काही म्हणायचं नाही मनामध्ये. कोणताही असा विचार घ्यायचा नाही. स्वत:बद्दल न्यूनता बाळगायची नाही. परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे. सगळे धुऊन टाकतो तो. झालं. आता हा उजवा हात करा माझ्याकडे. परत डाव्या हाताने बघा. गार येतंय का? येतंय नां! तुमच्याही डोक्यातून येतय. थोडं वर करून बघा. ही गणपतीची कृपा आहे. इतक्या लवकर कुठेच एवढं कार्य होत नाही. पण ही गणपतीची कृपा आहे, तेव्हा गणपतीला मनातून नमन करून, दोन्ही हात असे वर करायचे आणि असं मागे मान करून असं विचारायचं की, ‘ही चैतन्य शक्ती आहे का परमेश्वराची? ही त्याची प्रेमशक्ती आहे का? ही त्याची ब्रह्मशक्ती आहे का? अस तीनदा विचारायचं मनामध्ये.’ आता बघा. आता हात असे करा. होतय हातात गार. ज्या लोकांच्या डोक्यातून किंवा हातातून गार येतंय त्यांनी दोन्ही हात वर करायचे. व्वा! सगळं गावच पार झालंय, गणपतीच्या कृपेने! धन्य तुमची ! डोळेसुद्धा मिटले नाहीत आणि गावच्या गाव पार झाले. ही गणपतीची कृपा आहे. त्या पृथ्वीची किती कृपा आहे तुमच्यावरती. अहो, माझे हात तुटतात परदेशात. तिकडे नरक आहे नुसता आणि हा स्वर्ग आहे स्वर्ग!