Makar Sankranti Puja

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

Makar Sankranti Puja 14th January 1996 Date : Place Pune Type Puja Speech Language Hindi, English and Marathi


नम्रता आहे. ह्यांचं असं आहे, की एक अक्षर जर म्हटलं तर तर्क करणं सोडून जे म्हणेन ते. कधी उत्तर म्हणून मी काही ऐकलं नाही. इथे तसं नाही. इथे पट्कन ‘असं नाही. तसं. ‘ आपलं डोकं चालवतील प्रत्येक गोष्टीत. हे लोक एका अक्षराने बोलत नाहीत. माताजी म्हणतील ते शांतपणाने स्वीकारतील. त्यांनी असं कोणतं केलं पुण्य होतं मला समजत नाही. तुम्ही काही कमी पुण्य केलेले नाही, जे या देशात जन्माला आले. पण तो पुण्याचा पेटारा मागेच राहिला. तिकडे बघा कुठे असतो! तो पेटारा उघडला पाहिजे. त्याच्यात बघा स्वत:च स्वरूप म्हणजे कळेल केवढ्या मोठ्या देशात जन्म झाला तुमचा आणि इतिहास तुमचा केवढा उज्वल, किती मोठा! मला कधी कधी वाटतं, की हे मावळे परदेशात जाऊन जन्माला आलेत की काय? त्यांचे मावळ्यांसारखेच आहेत. गुण आणि तिकडचे उपटसुंभ इकडे आलेत की काय? अहो, ब्राझीलमध्ये, अमेरिकेत तर सोडा, पण ब्राझीलमध्ये अशा देशात, की जिथे आपल्यासारख्यांचा कधी संबंध आला नसेल तिथेसुद्धा सहजयोग इतका जोरात पसरला आहे आणि इतके गहरे लोक आहेत. यू.पी.मध्ये ३० आयएएस ऑफिसर्स सहजयोगात आहेत आणि इथे एकाही आयएएस ऑफिसर्सना…, शेपट्या आहेत सगळ्यांना. आधी त्यांच्या शेपट्या पडल्या पाहिजेत, मग माणसात येतील. शिष्टपणा फार. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये भयंकर शिष्टपणा आहे. हा शिष्टपणा जायला पाहिजे. नम्रता नाही. त्यातल्यात पुरुषांपेक्षा बायका जरा जास्त शिष्ठ आहेत. हे जर एकदा झालं आणि घटित झालं, आपली स्वत: ची ओळख जर झाली तर आपोआप मनुष्य नम्र होतो आणि हा शिष्टठपणा जायला पाहिजे. फार आवश्यक आहे. जर महाराष्ट्रीयन लोकांचा इतिहास बघितला, अहो, हा खरच महाराष्ट्र आहे! फार पवित्र, फार उच्च! पण हे झालंय काय मला समजत नाही. असे लोक इथे कसे आले आणि आले मला समजत नाही! सहजयोगात आल्यावर मात्र हीरा तासून घेतो कुठून तसं स्वत:ला तासून घेतलं पाहिजे. त्याची तेजस्विता जी आहे ती सूर्यासारखी झाली पाहिजे. नाहीतर पूजा करून तरी संक्रांतीचा काय फायदा आहे ? सूर्य म्हणायचं आणि दगडच्या दगड, त्याने काही काम होणार नाही. इथे पूजेवर पूजा झाल्या. म्हणून आता मी महारा्ट्रात पूजाच घेत नाही. पण काही परिणामच होत नाही तर काय फायदा? पूजेतसुद्धा फुकटखोरपणा, कंजूसपणा. फार स्पष्ट आहे. आणि मी बोलते ना तेव्हा लोकांना वाटतं, की माताजी कोणा दुसऱ्याबद्दल बोलताहेत. स्वत:बद्दल बोलताहेत हे लक्षातच येत नाही. म्हणजे आपल्यात बदल कसा होणार? आमचंच काहीतरी चुकलं असं कोणाला वाटेल. दिल्लीत तीनच महाराष्ट्रीयन्स सहजयोगी आहेत, पण ते इतके उत्तम आहेत. सगळे म्हणतात, माताजी, काही महाराष्ट्रीयन्स इथे बोलवा. म्हटलं, नको. राह देत तिकडे. जे उत्तम होते ते आले इकडे. आता नको. कर्मठ महाराष्ट्रीयन नको आहेत. फार कर्मठ आहेत. महात्मा गांधी गुजरात सोडून परदेशात का राहिले. कारण ते म्हणाले, महाराष्ट्रातच कर्मठपणा आहे, गुजरात्यांमध्ये नाही. कर्मठ असल्यामुळे आता फक्त कर्मकांडातच ते गेले. दुसरं काही राहिलेले नाही. पण त्यांचं सोडून द्या. आता तुम्ही सहजयोगात आलात, तर सहजयोगात आल्यावरती

एकनिष्ठ, त्यात जमवणं, ही एकनिष्ठता यायला पाहिजे. तरच नम्रता येईल. जर नम्रता आली नाही तर सहजयोग पसरवता येणार नाही. पसरणार नाही. सहजयोग पसरण्यासाठी नम्रता हे एक आवश्यक अंग आहे. जर ते नसेल तर कधीही, कितीही मेहनत केली तरी सहजयोग बसणार नाही. आई-वडिलांशी उद्धटपणा करायचा. शिष्टपणा दाखवायचा. मी सांगतेना, पाच- सहा महाराष्ट्रीयन मुलींनी मला जो त्रास दिलेला आहे, बाप रे बाप! मी अशा अवदसा मुली पाहिल्याच नव्हत्या, ऐकल्यासुद्धा नव्हत्या. नाटकातसुद्धा नसतात अशा. हे कुठले क्षेत्र आले बाहेर मला समजत नाही. नवऱ्यालासुद्धा मारतील थोबाडीत. काय म्हणाव! असे प्रकार कधी ऐकले नव्हते. जे आपल्या इकडे महाराष्ट्रीयन मुलींनी करून दाखवलेत प्रचंड! तेव्हा आपल्या मुलींना विशेष वळण लावले पाहिजे. उद्या त्यांना गृहलक्ष्मी बनायचे आहे. त्यांना समाज बनवायचा आहे. उद्या त्यांना मुलं होतील ती अशीच उद्धट होणार आणि मूर्खासारखे वागणार. आणि मग एक संघ बनतो अशा सगळ्या मुलींचा. एक-एक घाणेरड्या गोष्टी शिकतात, मग सहजयोगात राहु नका तुम्ही. आई-वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे. सगळीकडे महाराष्ट्राचं एकदम, पूर्णपणे नाक कापलेले आहे. ह्या मुलींच्यामुळे. जे लोक चांगले आहेत आणि तुमचे पुढारी आहेत ते सुद्धा थकून गेले. दूसरं पैसे द्यायचे नाही. नारगोलला म्हणे ६००० लोक आले होते फक्त ३००० लोकांनी पैसे दिले. असे भिक्कार लोक सहजयोगात नको. भिकाऱ्यांसाठी सहजयोग नाही. अनाथालयात जावं सगळ्यांनी. इथे त्याला पाहिजेत जातीचे. बेकार लोकांसाठी सहजयोग नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपलं महत्त्व समजलं पाहिजे. आज महाराष्ट्राकडे सर्व जगाचे डोळे लागलेले आहेत. इथे पीस फाऊंडेशनसाठी लोक आले होते. ज्या लोकांना त्यांनी आपल्या कमिटीमध्ये घेतले त्या सगळ्यांचं …(अस्पष्ट) एकेकांचं. सगळे धंदे आहेत इथे, पण ते जास्त का जाणवलं नाही. कारण ह्या धर्मभूमीत , ह्या योगभूमीत हे कार्य शोभत नाही. एकत-्हेने मला फार आशा आहे, की तुम्ही जागरूक व्हाल आणि महाराष्ट्र देशाचं कल्याण कराल. ह्या .(अस्पष्ट) टाकलेली आहे, की ह्या महाराष्ट्र देशाला जागृत करूयात. म्हटलं , दगडाला फारेनर्सनी काही कोण जागृत करणार आहे? बाहेरून होतं का? आतून एक विचार यायला पाहिजे. परत सांगते, महाराष्ट्राला फार गरज आहे. फारच गरज आहे. कारण सगळ्या दुनियेचे लक्ष इथे आहे. सगळ्यांची दृष्टी इथे आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकत-हेची नम्रता, एक संस्कृती असायला पाहिजे. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे! आणि एकच मागणं आहे, की ज्या देशात तुमचा जन्म झाला त्या देशाचे नाव मोठे करा. सहजयोगाच्या लोकांनी एवढं जरी केले तरी मी काही सांगणार नाही. देशाला सांभाळा. तुमच्यातूनच ते लोक निघणार आहेत, जे ह्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देणार आहेत. माझे सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहेत.